Yoga Mantra: वॉक दरम्यान सहज करू शकता 'ही' योगासनं, शरीर फिट ठेवण्यास करेल मदत
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Yoga Mantra: वॉक दरम्यान सहज करू शकता 'ही' योगासनं, शरीर फिट ठेवण्यास करेल मदत

Yoga Mantra: वॉक दरम्यान सहज करू शकता 'ही' योगासनं, शरीर फिट ठेवण्यास करेल मदत

Published May 14, 2025 10:56 AM IST

Yoga Tips in Marathi: जर तुम्ही तुमचे शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी दररोज चालत असाल, तर वॉक दरम्यान तुम्ही काही योगासन देखील करू शकता. जाणून घ्या ही कोणती योगासनं आहेत.

शरीर फिट ठेवण्यासाठी योगासन
शरीर फिट ठेवण्यासाठी योगासन

Yoga Poses for Fit Body: स्वतःला फिट ठेवयासाठी चालणे आणि योगा करण्यापेक्षा चांगले काहीही नाही. जर तुम्ही दररोज थोडा वेळ वॉक करण्यासोबतच योगासन केले तर तुम्ही स्वतःला बराच काळ तंदुरूस्त ठेवू शकता. तथापि, आजकाल वेळेअभावी बहुतेक लोकांना योगा करणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत, तुम्ही दररोज सकाळी चालायला जावे आणि चालताना काही योगासन करावे. असे केल्याने, तुम्ही स्वतःला दोन फिटनेस अॅक्टिव्हिटीमध्ये गुंतवून घेऊ शकता आणि चालताना काही योगासन करू शकता.

साईड बॉडी स्ट्रेच

साईड बॉडी स्ट्रेच हा शरीराच्या साईडसाठी चांगला ओपनिंग स्ट्रेच आहे. हे करण्यासाठी तुमचे पाय कंबरेपर्यंत वेगळे ठेवून उभे रहा आणि तुमचे हात तुमच्या डोक्याच्या वर घ्या. आता डाव्या हाताने ताणायला सुरूवात करा आणि उजव्या हाताला डाव्या हाताने धरा. एका वेळी फक्त एकच हात स्ट्रेच करा, दुसरा हात तुमच्या बाजूला ठेवा. नंतर दुसऱ्या बाजूने पुन्हा करा.

गरुडासन

तुमचे खांदे आणि पाठीचा वरचा भाग ताणण्यासाठी आणि ताण कमी करयासाठी, तुमचे हात ईगल पोझ मध्ये घ्या. नंतर उजवा हात डाव्या हाताखाली आणून, कोपर क्रॉस करा. तुमचे तळवे एकमेकांसमोर घडी करा. तुमचा कोपर वर घ्या. असे केल्याने तुम्हाला तुमच्या पाठीच्या वरच्या भागात ताण जाणवेल. नंतर ५ खोल श्वास घ्या आणि साइड बदला.

उत्तानासन

हे आसन संपूर्ण पाठीला आराम देण्यासाठी आणि मन शांत करण्यासाठी उत्तम आहे. यासाठी, तुमचे पाय कंबरेपर्यंत वेगळे ठेवा आणि पुढे वाकायला सुरूवात करा. नंतर तुमचे गुडघे वाकलेले आणि तुमचे पोट तुमच्या मांड्यांना स्पर्श करत पाठ सरळ ठेवा. तुमचे हात जमिनीवर ठेवा. नंतर पाठ आणखी सैल करण्यासाठी हळूहळू एका बाजूने दुसऱ्या बाजूला जा. हे करत असताना, काही खोल श्वास घ्या.

वृक्षासन

हे करण्यासाठी प्रथम तुमचे सर्व वजन एका पायावर ठेवा, नंतर दुसरा पाय वर उचला आणि तो तुमया नडगीवर किंवा मांडीच्या आतील बाजूस ठेवा. आता तुमचे तळवे तुमच्या हृदयासमोर एक सोबत ठेवा किंवा त्यांना वरच्या दिशेने घ्या. हे करत असताना खोल श्वास घ्या आणि नंतर साइड बदला.

प्रसारित पादोत्तानासन

हे आसन करण्यासाठी समोर तोंड कन उभे रहा. नंतर तुमचे पाय कंबरेपेक्षा रुंद अंतराने सुरूवात करा. आता तुमचे हात तुमच्या कंबरेवर ठेवा आणि कंबरेपासून पुढे वाकायला सुरूवात करा. आता तुमचे हात जमिनीवर किंवा गुडघ्यांवर ठेवा. श्वास घेताना तुमचा पाठीचा कणा सरळ करा, श्वास सोडताना आणखी खोलवर जा. आता तुमचे हात तुमच्या पायांमध्ये घ्या आणि ५-१० श्वासांपर्यंत थांबा

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Hiral Shriram Gawande

TwittereMail

हिरल गावंडे हिंदुस्तान टाइम्स- मराठीमध्ये डेप्युटी चीफ कन्टेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून ती लाइफस्टाईल संबंधित बातम्या लिहिते. प्रिंट आणि डिजिटलमध्ये एकूण ११ वर्षांचा अनुभव आहे. यापूर्वी हिरलने दैनिक दिव्य मराठी आणि ट्रेल अॅपमध्ये काम केले आहे. हिरलने एमए (समाजशास्त्र) आणि पुणे विद्यापीठाच्या रानडे इंस्टिट्युट येथून पीजी डिप्लोमा इन मास मिडियाचे शिक्षण घेतले आहे.

Whats_app_banner