Yoga Mantra: शीर्षासन करताना तुम्ही तर करत नाही ना या चुका? फायदा मिळवण्यासाठी पाहा योग्य पद्धत
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Yoga Mantra: शीर्षासन करताना तुम्ही तर करत नाही ना या चुका? फायदा मिळवण्यासाठी पाहा योग्य पद्धत

Yoga Mantra: शीर्षासन करताना तुम्ही तर करत नाही ना या चुका? फायदा मिळवण्यासाठी पाहा योग्य पद्धत

Published Jul 06, 2024 09:43 AM IST

Shirshasana Benefits in Marathi: बरेच लोक योगाभ्यास करताना शीर्षासन करतात. पण त्याचा पूर्ण फायदा मिळवण्यासाठी काही चुका टाळल्या पाहिजे.

शीर्षासन करण्याची योग्य पद्धत आणि फायदे
शीर्षासन करण्याची योग्य पद्धत आणि फायदे

Right Way of Doing Shirshasana: बदलत्या जीवनशैलीमुळे स्ट्रेस, थकवा जाणवणे ही खूप सामान्य समस्या बनली आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखण्यासाठी योगासन खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. बरेच लोक नियमित योगाभ्यास करताना शीर्षासन सुद्धा करतात. तर काही लोकांना शीर्षासन करणे अवघड वाटते. शीर्षासन हे मानसिक समस्यांसाठी खूप प्रभावी आहे. शीर्षासन केल्याने एकाग्रता वाढते. तसेच आपले बॉडी पोश्चर देखील चांगले राहते. हृदय आणि श्वासासंबंधीच्या समस्या सुद्धा शीर्षासनाने दूर होतात. पण याचा पूर्ण फायदा मिळवण्यासाठी ते योग्य पद्धतीने करणे तेवढेच महत्त्वाचे आहे. चुकीच्या पद्धतीने केलेले योगासनाचा हवा तसा फायदा होत नाही. पूर्ण फायदा मिळवण्यासाठी शीर्षासन करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या. तसेच कोणत्या चुका करू नये आणि त्याचे फायदे पाहा.

शीर्षासन करण्याचे फायदे

- शीर्षासन रोगप्रतिकार शक्ती आणि कार्यक्षमता वाढवून आपल्याला एनर्जेटिक बनवते.

- मेंदूमध्ये ब्लड सर्कुलेशन नीट करते.

- पिट्युटरी आणि पाइनल ग्रंथींचे स्त्राव नियंत्रित करते.

- स्मरणशक्ती, एकाग्रता, उत्साह, ऊर्जा, निर्भयता, आत्मविश्वास आणि संयम वाढवते.

- हे एकाग्रता सुधारते, तसेच स्मरणशक्ती सुधारते.

- हे स्त्रियांमध्ये रजोनिवृत्तीशी संबंधित समस्या देखील सुधारते.

- शरीराचे स्नायू बळकट करण्यासोबतच मानसिक आरामही मिळतो.

शीर्षासन करण्याची योग्य पद्धत

शीर्षासन करण्यासाठी सर्वप्रथम योगा मॅटवर वज्रासनात बसा. यानंतर दोन्ही कोपर जमिनीवर ठेवा आणि दोन्ही हातांची बोटे एकत्र करा. दोन्ही हातांची बोटे जोडून तुमचे तळवे वरच्या दिशेला असले पाहिजे, जेणेकरुन तुम्ही तुमच्या तळहाताने तुमच्या डोक्याला आधार देऊ शकता. पुढे वाकताना हळूहळू तळहातावर डोके ठेवा. हे करत असताना श्वास सामान्य ठेवा आणि हळूहळू शरीराचा भार डोक्यावर येऊ द्या. या स्थितीत येताना तुम्हाला तुमचे पाय आकाशाकडे वर न्यावे लागतील. जसे तुम्ही तुमच्या सरळ पायांवर उभे असता, तसेच तुम्ही तुमच्या डोक्यावर उलटे उभे आहात. काही काळ या स्थितीत रहा आणि नंतर सामान्य स्थितीत परत या.

शीर्षासन करताना करू नका या चुका

- कोपर खूप रुंद किंवा त्यात अंतर ठेवणे

- नितंब खांद्याच्या मागे आणणे

- डोक्याची चुकीची स्थिती

- हाता-पायांमध्ये सामान्य अंतर न ठेवणे

- श्वास खूप वेगाने घेणे

- पाठीच्या कण्यावर जास्त भार देणे

- महिलांनी रजोनिवृत्तीच्या काळात शीर्षासन करू नये.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner