Yogasana for Skin Care in Summer: महिला असो वा पुरुष चमकदार आणि निरोगी त्वचेसाठी दररोज वेगवेगळ्या प्रकारच्या रेमेडीचा अवलंब करत असतात. पण हे सर्व रेमेडी किंवा उपाय प्रभावी ठरतातच असे नाही. अशा वेळी एखाद्या व्यक्तीने आपल्या त्वचेचे आरोग्य राखण्यासाठी निरोगी आहाराबरोबरच योगाचा आपल्या रुटीनमध्ये समावेश केला पाहिजे. नियमित योगाभ्यास शरीरातील सर्व विषारी पदार्थ काढून चेहऱ्याची चमक वाढवण्याचे काम करतो. चला तर मग जाणून घेऊया अशाच योगासनांबद्दल जे व्यक्तीला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी ठेवतात आणि त्वचा सुद्धा चमकदार बनवतात.
त्रिकोणासनामुळे शरीराचे रक्ताभिसरण सुधारते आणि चेहऱ्याच्या त्वचेला अधिक ऑक्सिजन आणि पोषण मिळते. ज्यामुळे चेहऱ्याचा रंग सुंदर आणि चमकदार होतो. त्रिकोणासन करण्यासाठी सर्वप्रथम उभे राहून आपल्या पायांमध्ये ३-४ फूट अंतरावर ठेवा. यानंतर आपले दोन्ही हात शरीराला लागून ठेवा आणि आपला डावा पाय उजवीकडे फिरवा. हे करताना आपले दोन्ही पाय सरळ रेषेत असावेत. आता पाय फिरवण्याबरोबरच कंबर फिरवा. हे करत असताना दोन्ही हात खाली न्या आणि त्यांना दोन्ही पायांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. ही स्थिती २०-३० सेकंद ठेवा आणि हळूहळू श्वास सोडा आणि सामान्य स्थितीत परत जा. ही प्रक्रिया आपल्या उजव्या पायाच्या बाजूने देखील पुन्हा करा.
सर्वांगासनाला इंग्रजीत 'शोल्डर स्टँड' आणि 'क्वीन ऑफ योगासन' असेही म्हणतात. हे आसन व्यक्तीच्या संपूर्ण शरीराला ताणून शरीराचे रक्ताभिसरण सुधारू शकते. ज्यामुळे त्वचेला अधिक ऑक्सिजन आणि पोषण मिळते. हे आसन केल्याने त्वचेतून विषारी पदार्थ बाहेर पडतात. ज्यामुळे त्वचा चमकदार आणि सुंदर दिसते. सर्वांगासन करण्यासाठी सर्वप्रथम योगा मॅटवर झोपा आणि आपले पाय तीन ते चार इंच अंतरावर ठेवा. यानंतर आपले हात आपल्या पायाकडे ठेवून हातांच्या साहाय्याने पाय वर करा. हे करत असताना आपल्या कंबरेला आधार द्या आणि पाय वरच्या दिशेने वर उचला. हे करत असताना तुमच्या संपूर्ण शरीराचं वजन तुमच्या खांद्यावर असेल याची विशेष काळजी घ्या. शरीर सरळ ठेवत २०-३० सेकंद ही स्थिती ठेवा आणि नंतर हळूहळू श्वास सोडा. यानंतर हळूहळू आपले पाय योगा मॅटवर आणा आणि आरामात श्वास सोडा. ही प्रक्रिया दोन वेळा केल्यानंतर हळूहळू आसनातून बाहेर या.
संबंधित बातम्या