Yoga Mantra: काम करायचा कंटाळा येतो आणि दिवसभर थकवा जाणवतो का? रूटीनमध्ये समाविष्ट करा 'ही' योगासनं-yoga mantra try these yoga poses to stay active and energetic and remove laziness and fatigue ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Yoga Mantra: काम करायचा कंटाळा येतो आणि दिवसभर थकवा जाणवतो का? रूटीनमध्ये समाविष्ट करा 'ही' योगासनं

Yoga Mantra: काम करायचा कंटाळा येतो आणि दिवसभर थकवा जाणवतो का? रूटीनमध्ये समाविष्ट करा 'ही' योगासनं

Sep 19, 2024 10:04 AM IST

Yoga to Remove Laziness and Fatigue: ही दोन योगासनं तुमच्या शरीरात ऊर्जा टिकवून दिवसभर अॅक्टिव्ह राहण्यास मदत करतील. ज्यामुळे तुमची सकाळ फ्रेश होईल.

भुजंगासन- थकवा दूर करण्यासाठी योगासन
भुजंगासन- थकवा दूर करण्यासाठी योगासन

Yoga Poses to Stay Active and Energetic: अनेक वेळा रात्री चांगली झोप घेऊनही सकाळी उठून थकवा आणि आळस जाणवतो. यामुळे तुम्ही दिवसभर आपल्या कामात आपले शंभर टक्के देऊ शकत नाही, तर टेन्शन दूर करा आणि रुटीनमध्ये या २ योगासनांचा समावेश करा. ही दोन योगासने आपल्या शरीरात ऊर्जा टिकवून दिवसभर सक्रिय ठेवण्यास मदत करतील. ज्यामुळे तुमची सकाळ फ्रेश होईल. चला तर मग उशीर न करता जाणून घेऊया, कोणती आहेत ही दोन योगासनं.

भुजंगासन

भुजंगासनाला कोब्रा पोज असेही म्हणतात. कारण हा योग करताना व्यक्तीचे शरीर सापासारखे दिसते. हे आसन केल्याने पोट आणि कमरेभोवतीची चरबी कमी होण्याबरोबरच ताणही दूर होतो. या आसनामुळे पाठीचा खालचा भागही मजबूत होतो आणि शरीराची एनर्जी लेव्हल चांगली राहते. भुजंगासन करण्यासाठी सपाट जागेवर योगा मॅट ठेवून पोटावर झोपावे आणि दोन्ही पाय एकमेकांना जोडून ठेवावे. यानंतर दोन्ही हात कोपरापासून वाकवून दोन्ही तळवे छातीशेजारी जमिनीवर ठेवावेत. हे करत असताना दीर्घ श्वास घ्या आणि डोके वर करून मान वरच्या दिशेने उचला. हळूहळू छाती आणि नंतर पोट हळूहळू वर करा. या स्थितीत राहून आकाशाकडे पाहण्याचा प्रयत्न करा. हे करताना मान सरळ ठेवा. या आसनात थोडा वेळ राहा.

पवनमुक्तासन

पवनमुक्तासनाला इंग्रजीत विंड रिलीविंग पोझ म्हणतात. पवनमुक्तासनाच्या नियमित सरावामुळे पचनसंस्था मजबूत होते आणि गर्भाशयाशी संबंधित समस्यांमध्ये महिलांना फायदा होतो. हे आसन वजन कमी करण्याबरोबरच आळस आणि थकवा दूर करण्यास देखील मदत करते. पवनमुक्तासन करण्यासाठी शांत ठिकाणी योगा मॅट ठेवून सरळ झोपावे. श्वास घेताना आपले पाय ९० डिग्रीपर्यंत वर घ्या. यानंतर श्वास सोडा आणि पाय वाकवून गुडघे छातीवर आणण्याचा प्रयत्न करा. हे करत असताना, आपल्या बोटांनी आपले गुडघे धरून डोके वर करा. आपल्या कपाळाने गुडघ्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. थोडा वेळ या आसनात राहून श्वास सामान्य ठेवा. यानंतर डोके आणि नंतर पाय खाली आणा. या योगासनाचा २ ते ३ वेळा सराव करा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner
विभाग