Yoga Mantra: सहज नाहीसे करायचे डार्क सर्कल्स? काही मिनिटे करा हे फेस योगा
Face Yoga: डोळ्यांखाली असलेले डार्क सर्कल तुमचा लूक खराब करतात. हे घालवण्यासाठी महिला कितीतरी उपाय करत असतात. तुम्ही काही मिनिटे हे फेस योगा करुन ते सहज दूर करू शकता.
Simple Face Yoga For Dark Circles: डोळ्यांखाली काळी वर्तुळे म्हणजेच डार्क सर्कल होण्याचे अनेक कारणे असू शकतात. झोप न लागणे, पाण्याची कमतरता, ताणतणाव, हार्मोन्समधील बदल, अनुवांशिक समस्या यामुळे हे होऊ शकते. डार्क सर्कल कमी करण्यासाठी पुरेशी झोप घेण्याचा सल्ला दिला जातो. त्यासोबतच लॅपटॉप आणि मोबाईल यांसारख्या गोष्टी कमी वापरण्याचा सल्ला दिला जातो. या सर्वांसह तुम्ही काही फेस योगाच्या मदतीने डोळ्यांखालील डार्क सर्कल्स सहजपणे दूर करू शकता.
ट्रेंडिंग न्यूज
डार्क सर्कल दूर करण्यासाठी फेस योगा
डार्क सर्कलवर टॅप करा
तुमची तर्जनी आणि मधले बोट तुमच्या डोळ्याच्या सॉकेटच्या आतील बाजूस ठेवा. नंतर ५ ते १० सेकंद हळूवारपणे दाबा. पुढे डोळ्यांखालील भाग हलके टॅप करणे सुरू करा. आतून बाहेरच्या बाजूने जा आणि हे क्षेत्र तुमच्या भुवयाच्या वरपर्यंत सर्कुलर मोशनमध्ये ट्रेस करा. हे १० ते १५ वेळा पुन्हा करा. असे केल्याने रक्त प्रवाह सुधारेल. रक्ताचा प्रवाह चांगला झाल्याने डार्क सर्कल कमी होतील.
डोळ्यांखाली सॉफ्ट स्किन ओढा
तर्जनी आपल्या आयब्रोवर आणि मधले बोट डोळ्याखाली ठेवा. दोन्ही डोळ्यांसाठी हे करा. आता त्वचेवर हलका दाब देऊन बोटांना हेअरलाइनच्या दिशेने ओढा. तुम्ही तुमची बोटे ओढत असताना, त्यांच्यातील अंतर बंद करा. हेअर लाईनपर्यंत पोहोचाल तेव्हा तुमच्या बोटांमध्ये अंतर नसावे. हेअरलाइनवर हलके टॅप करा. आता ३ ते ५ वेळा पुन्हा करा. हे तुमच्या डोळ्यांखालील त्वचा गुळगुळीत करेल आणि रक्त प्रवाह वाढवेल. ज्यामुळे डार्क सर्कल हलकी होण्यास मदत होईल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)