Body Cooling Yoga Poses: उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी लोक त्यांच्या आहारात थंड प्रभाव असलेली फळे आणि ड्रिंक्स यांचा समावेश करतात. असे केल्याने ऊन आणि उष्णतेपासून तसेच उष्माघातापासून संरक्षण होते. पण तुम्हाला काही योगासनांबद्दल माहिती आहे का जे तुमच्या शरीराला नैसर्गिक पद्धतीने थंड ठेवतात? चला जाणून घेऊया अशा ३ उत्तम योगासनांविषयी, जे शरीराला थंड ठेवतात. ही योगासनं करण्याची योग्य पद्धत पाहा.
शोल्डर स्टँड किंवा सर्वांगासन, एक योगासन आहे ज्यामध्ये संपूर्ण शरीर खांद्यावर संतुलित केले जाते. सर्वांगासन हा एक संपूर्ण शरीराचा व्यायाम आहे जो अनेक स्नायू गटांवर कार्य करतो आणि आपल्याला चांगले शारीरिक संतुलन, चांगले पोश्चर आणि शांतता प्राप्त करण्यास मदत करतो. उन्हाळ्यात शरीराच्या तापमानात लक्षणीय वाढ होते. अशा परिस्थितीत सर्वांगासनाच्या सरावाने आराम मिळतो. सर्वांगासन करण्यासाठी प्रथम योगा मॅटवर पाठीवर झोपा आणि गुडघे न वाकवता दोन्ही पाय वर करा. यानंतर कोपर जमिनीवर ठेवा आणि दोन्ही हातांनी कमरेला आधार द्या. दोन्ही पाय वरच्या दिशेने सरळ ठेवा आणि ९० अंशांचा कोन करा. काही वेळ या स्थितीत राहा आणि नंतर हळू हळू पाय खाली आणा.
शीतली प्राणायाम करण्यासाठी सर्वप्रथम, आपले दात हलके जोडून आपली जीभ दातांच्या मागे ठेवा आणि दीर्घ श्वास घ्या. तोंडातून श्वास घ्या आणि नाकातून श्वास सोडा. हे दिवसाच्या कोणत्याही वेळी केले जाऊ शकते. हे सुमारे ११ वेळा करा. जर तुमचे ओठ कोरडे पडत असतील तर सुरुवातीला असे पाच ते सहा वेळा करा. हा प्राणायाम शरीराचे तापमान कमी करण्यासाठी तसेच मेंदूला थंड ठेवण्यासाठी चांगला मानला जातो. लक्षात ठेवा ज्यांना खोकल्याचा त्रास होतो त्यांनी हा प्राणायाम करणे टाळावे.
शरीराचा समतोल राखण्यासोबतच वृक्षासन शरीराला थंड ठेवण्याचे काम करते. यासाठी उजवा पाय डाव्या पायाच्या मांडीवर ठेवा आणि दोन्ही हात जोडून वर उचला. अर्धा ते एक मिनिट या आसनात संतुलन राखा. त्याच प्रमाणे ही प्रक्रिया दुसऱ्या पायाने देखील करा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या