मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Yoga Mantra: पाठदुखीचा त्रास असेल तर कधीही करा 'हे' योगासन, लगेच मिळेल आराम

Yoga Mantra: पाठदुखीचा त्रास असेल तर कधीही करा 'हे' योगासन, लगेच मिळेल आराम

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jan 27, 2023 08:17 AM IST

Back Pain: हिवाळ्यात पाठदुखी ही एक सामान्य समस्या आहे. झोपेतून उठल्यानंतर अनेक वेळा पाठ आणि कंबरेत तीव्र वेदना होतात. त्यामुळे योगासने आराम देण्यास मदत करतात. पाठदुखीचा त्रास होत असेल तर ही दोन योगासने फायदेशीर ठरतील.

पश्चिमोत्तानासन
पश्चिमोत्तानासन

Yoga Poses for Instant Back Pain Relief: हिवाळ्यात अनेकदा लोकांच्या शरीरात जडपणा येण्याची समस्या उद्भवते. त्यामुळे हात-पाय तसेच पाठीत दुखणे सुरू होते. सकाळी झोपेतून उठताना किंवा दुपारी अंग टाकल्यानंतर उठताना हा त्रास वाढतो. योगासनांमुळे शरीरातील अशा प्रकारच्या कडकपणामध्ये जलद फायदा होतो. योगासनांमुळे शरीरातील वेदना कमी होतात आणि सुस्ती दूर होते. चला तर मग जाणून घेऊया असे योगासन, जे पाठ आणि शरीराच्या दुखण्यासोबतच सुस्तीपासून मुक्त होण्यास मदत करेल.

पश्चिमोत्तानासन

पश्चिमोत्तानासन केल्याने खांदा आणि मणका ताणला जातो. त्यामुळे कंबरदुखीपासून आराम मिळतो. यासोबतच हे आसन डोकेदुखी आणि सुस्ती दूर करते. उच्च रक्तदाब, निद्रानाश बरा करण्यासोबतच पश्चिमोत्तनासन केल्याने मन शांत राहते आणि तणाव दूर राहतो. हे करण्यासाठी सर्वप्रथम योगा मॅटवर बसा. दोन्ही पाय बाहेरच्या दिशेने पुढे करा. श्वास घ्या आणि हळू हळू हात वर करुन हळू हळू खाली वाका आणि संपूर्ण पायापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला संपूर्ण शरीर वाकणे कठीण आहे. हळू हळू करा, सुमारे ५ सेकंद राहिल्यानंतर, आपल्या सामान्य स्थितीत परत या.

भुजंगासन

हे आसन केल्याने पाठदुखीसह हातांचे स्नायूही मजबूत होतात. यासोबतच ही आसने कंबर आणि पोटाची चरबी कमी करण्यास मदत करतात. हे करण्यासाठी, प्रथम योगा मॅटवर पोटावर झोपा. तळवे जमिनीवर ठेवून, शरीराचा अर्धाभाग उचला. डोके मागे टेकवून सुमारे ५ सेकंद या आसनात राहा. या योगामध्ये शरीराची मुद्रा सापासारखी केली जाते. तीव्र पाठदुखीवर हे आसन केल्याने फायदा होतो.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग