Joint Pain Remedies: बिघडलेली आणि निष्क्रिय जीवनशैली आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींचा शरीरावर प्रचंड मोठा परिणाम होतो. त्यामुळे आजकाल लोक लहान वयापासूनच हाडे आणि सांधे दुखण्याची तक्रार करू लागले आहेत. लोक सहसा सांधेदुखीकडे दुर्लक्ष करतात किंवा वेदना जाणवत असताना पेनकिलर घेतात. ज्यामुळे दुखण्यापासून तात्काळ आराम मिळतो. पण या औषधांचेही वेगवेगळे दुष्परिणाम होतात. जर तुम्हाला हाडे आणि सांधेदुखीपासून आराम मिळवायचा असेल, तर सर्वप्रथम तुमची जीवनशैली सुधारा आणि दररोज योगा करा. योगाभ्यास केल्याने केवळ सांधेदुखीपासून आराम मिळत नाही. तर इतरही अनेक समस्या सोडवता येतात.आज आम्ही तुम्हाला अशी सांधेदुखीसाठी ३ योगासने सांगत आहोत, त्यांचा नियमित सराव केल्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो.
जर तुम्हाला हाडे आणि सांधेदुखीपासून आराम मिळवायचा असेल, तर दररोज चक्रासन म्हणेजच व्हील पोजचा सराव सुरू करा. चक्रासनाचा सराव केल्याने हाडे आणि सांधेदुखी कमी होण्यास मदत होते. हे योगासन हृदयाला निरोगी बनवते आणि पोट, मान आणि कंबरेचे स्नायू यांसारख्या अंतर्गत अवयवांना बळकट करण्यास मदत करते. चक्रासन केल्याने पाठ, खांदे, मांड्या आणि गुडघे यांचे स्नायू संतुलित होण्यास मदत होते. त्यामुळेच या आसनाच्या नियमित सरावाने सांधेदुखीची समस्या दूर होते.
हाडे आणि सांधेदुखी कमी करण्यासाठी उष्ट्रासन किंवा कॅमल पोज हे एक उत्कृष्ट आसन आहे. या आसनामुळे कंबर, मान आणि पाठीचे स्नायू स्थिर होण्यास मदत होते. उष्ट्रासन केल्याने केवळ हृदयाचे आरोग्य सुधारत नाही तर फुफ्फुसांचे आरोग्यही सुधारते. चक्रासन नियमित केल्याने वजन नियंत्रित राहते आणि शरीरातील आळस दूर होतो. ज्यांना वारंवार पाठ आणि सांधेदुखीचा त्रास होतो त्यांनी या आसनाचा नियमित सराव करावा.
त्रिकोनासनाला त्रिकोण किंवा त्रिकोणी आसन असेही म्हणतात. या आसनाच्या नियमित सरावाने हाडे मजबूत होतात आणि सांधेदुखीपासूनही आराम मिळतो. याशिवाय त्रिकोनासनामुळे पाठीचे आणि पोटाचे स्नायू बळकट होतात आणि पचनक्रिया चांगली ठेवण्यास मदत होते. त्रिकोनासनाच्या नियमित सरावाने मांडीचे स्नायू मजबूत होतात आणि शरीर स्थिर राहण्यास मदत होते.
हे आसन गुडघ्यांचे स्नायू मजबूत करते आणि ऑस्टियोपोरोसिसमध्ये देखील फायदेशीर आहे. हे आसन मेंदूला शांत करते. रुग्णाला चिंतेपासून मुक्त करते आणि शरीरातील ताण कमी करते.
धनुरासनमुळे बंद खांदे उघडतात. हे आसन पाठीला आणि हाता पायांच्या स्नायूंना लवचिक बनवते. आणि शरीरातील ताण आणि जडपणा दूर करते. या आसनाच्या नियमित सरावाने सांदेदुखी दूर होण्यास मदत होते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. याबाबतीत संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या