Yogasana to Correct Body Posture: सध्याच्या बदलेल्या जीवनशैलीमुळे प्रत्येक व्यक्तीला शारीरिक, मानसिक आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अशीच एक समस्या म्हणजे खराब बॉडी पोश्चर. सतत अनेक तास लॅपटॉपसमोर चुकीच्या पद्धतीने बसल्याने लोकांचे बॉडी पोश्चर खराब होत आहे. हे दिसायला तर वाईट दिसतेच पण चुकीच्या पोश्चरमुळे अनेक समस्या आणि वेदनांचा त्रास सुद्धा होऊ शकतो. चुकीच्या पद्धतीने बसल्यामुळे तुमचे सुद्धा बॉडी पोश्चर बिघडत असेल तर या ३ योगासनांचा तुमच्या डेली रूटीनमध्ये समावेश करा. हे तुमचे पोश्चर सुधारण्यास मदत करतील.
या आसनाची मुद्रा मांजरीच्या मुद्रासारखी दिसते. त्यामुळे या आसनला मार्जरी आसन असे म्हटले जाते. या आसनामुळे पाठीचे हाड मजबूत होते आणि शरीर चपळ होते. तसेच, हे योगासन शरीराची स्थिती सुधारण्यासाठी उपयुक्त आहे. कारण त्यात कंबर पूर्णपणे सरळ असते.
याला पिजन पोझ असेही म्हणतात. हे एक हिप ओपनर आहे, जो तुमचा मणका, हॅमस्ट्रिंग आणि ग्लूट्स सैल करतो. हे आसन केल्याने तुमचे पाय ताणले जातात. वर्कआउट सुरू करण्यापूर्वी वॉर्मअप करण्यासाठी हे आसन एक सर्वोत्तम पर्याय आहे. बॉडी पोश्चर सुधारण्यासाठी हे आसन नियमित करणे फायदेशीर ठरू शकते.
याला इंग्लिशमध्ये माउंटन पोझ असे म्हणतात. याचा सराव करणे खूप सोपे आहे. हे शरीराला व्हर्टिकल अलाइनमेंट मध्ये ठेवते आणि तुमचे खांदे, छाती आणि हात देखील मजबूत करते. त्यामुळे शरीर सुडौल होते. हे आसन नियमित केल्याने शरीराचे पोश्चर सुधारण्यास मदत होते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)