Yoga Mantra: हाय बीपीचा त्रास आहे? अजिबात करू नका हे योगासन, होईल नुकसान
निरोगी आरोग्यासाठी योगासन उत्तम मानले जाते. पण असे काही योगासन आहेत, जे तुम्ही उच्च रक्तदाबाचा त्रास असल्यास करु नये. कोणते ते जाणून घ्या.
Avoid these Yoga in High Blood Pressure: योग तुमच्या अनेक शारीरिक आणि मानसिक समस्यांवर उपाय करु शकते. रोज योगाभ्यास केल्याने माणसाला अनेक समस्यांपासून मुक्ती मिळते. उच्च रक्तदाब नियंत्रित करणारी अनेक योगासने तुम्ही ऐकली असतील. पण आज आपण उच्च रक्तदाब नियंत्रित करणार्या योग आसनांबद्दल नाही तर उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या लोकांनी कोणती योगासने करु नयेत याबद्दल सांगणार आहोत. योगामध्ये असे काही व्यायाम आहेत जे उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या रुग्णांनी करु नये, असे सल्ला तज्ञ देतात. या योगासनांमुळे व्यक्तीचा रक्तदाब वाढण्याचा धोका असतो. चला जाणून घेऊया या योगासनांबद्दल.
ट्रेंडिंग न्यूज
अधोमुख श्वानासन
अधोमुख श्वानासन हे शरीराच्या वरच्या भागात, विशेषत: डोक्याला रक्तप्रवाह वेगाने वाढवण्यासाठी ओळखले जाते. पण हे आसन उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी करू नये. अशा योगासनांमुळे रक्तदाब वाढतो.
शीर्षासन
डोक्यातील रक्ताभिसरणाला चालना देण्याबरोबरच शारीरिक संतुलन सुधारण्यासाठी शिर्षासन योगाचे खूप महत्त्व असल्याचे सांगितले जाते. परंतु ज्या लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे, त्यांनी शिर्षासन योग न करण्याचा सल्ला दिला जातो. खरं तर या व्यायामादरम्यान डोक्यात रक्त प्रवाह अचानक वाढतो, ज्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या वाढण्याचा धोका असतो.
उत्तानासन
उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्यांनी उत्तानासन योगाचा सराव टाळावा. योग तज्ज्ञांच्या मते, अशी योगासने करताना पाय आणि धड उंचीवर असावे लागतात. याशिवाय डोके हृदयाच्या खाली येते. या स्थितीमुळे उच्च रक्तदाबाचा धोका वाढू शकतो.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)