Yoga Mantra: शरीर डिटॉक्स करण्यास मदत करतात ही ३ योगासनं, सकाळी करण्यासाठी आहेत उत्तम
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Yoga Mantra: शरीर डिटॉक्स करण्यास मदत करतात ही ३ योगासनं, सकाळी करण्यासाठी आहेत उत्तम

Yoga Mantra: शरीर डिटॉक्स करण्यास मदत करतात ही ३ योगासनं, सकाळी करण्यासाठी आहेत उत्तम

Published Jun 22, 2024 08:18 AM IST

Yoga for Body Detoxification: शरीरातील टॉक्सिन्स काढण्यासाठी योगासन मदत करतात. आपले शरीर डिटॉक्स करण्यासाठी कोणते योगासन करू शकते ते पाहा

शरीर डिटॉक्स करण्यासाठी योगासन
शरीर डिटॉक्स करण्यासाठी योगासन

Yogasana to Detox Body: निरोगी आणि फिट राहण्यासाठी संतुलित आहारासोबतच व्यायाम सुद्धा महत्त्वा आहे. तसेच शरीर डिटॉक्स करणे खूप आवश्यक असते. डिटॉक्स फूड आणि ड्रिंक्स घेण्याव्यतिरिक्त शरीरात जमा झालेले विषारी पदार्थ दूर करण्यासाठी सोप्या योगासनांची मदत देखील घेऊ शकता. हे ३ योगासनं शरीर डिटॉक्स करण्यास मदत करतात. कोणते ते जाणून घ्या

भारद्वाजासन

या आसनामुळे शरीराची लवचिकता वाढू लागते. त्याच्या नियमित सरावाने शरीर केवळ डिटॉक्सच नाही तर तंदुरुस्त राहते. या आसनाचे वैशिष्ट्य म्हणजे याने शरीरातील स्नायू ताणले जातात आणि अनेक आजार दूर होतात. हे आसन करण्यासाठी चटईवर बसा. त्यानंतर सुखासनाच्या आसनात बसा आणि डोळे बंद करा. आता उजव्या हाताने डाव्या गुडघ्याला स्पर्श करा. त्याच वेळी, डाव्या हाताने उजव्या पायाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला ३० सेकंद ते एक मिनिट या आसनात राहण्याचा प्रयत्न करा. एकदा केल्यावर आता दुसऱ्यांदा डाव्या हाताने उजव्या गुडघ्याला स्पर्श करा. हा योग करताना मान मागे वाकवा.

अधोमुख श्वानासन

सूर्यनमस्काराच्या सात आसनांपैकी एक आसन म्हणजे अधोमुख श्वानासन आहे. हे करण्यासाठी आपले शरीर पुढे वाकते. त्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण चांगल्या पद्धतीने सुरू होते. या योगामुळे शरीराचे अनेक भाग ताणले जातात. हा योग स्ट्रेचिंग व्यायामामध्ये गणला जातो. हे करण्यासाठी सरळ उभे रहा. यानंतर दोन्ही हात वरच्या दिशेने न्या आणि हात सरळ करा. आता शरीराला पुढे वाकवा आणि गुडघे वाकवताना दोन्ही हात जमिनीवर ठेवा. दोन्ही हात आणि दोन्ही पाय यामध्ये अंतर असणे आवश्यक आहे. हा योग करत असताना टाच उचलण्याचा प्रयत्न करा.

नौकासन

बॉडी डिटॉक्स ठेवण्यासाठी तुमच्या रुटीनमध्ये नौकासनाचा समावेश करा. हे मसल्स क्रॅम्प आणि पाय दुखण्यापासून देखील आराम देऊ शकते. हे करण्यासाठी योगा मॅटवर सरळ झोपा. यानंतर दोन्ही हात पायांना जोडा. आता हळू हळू वर उठा आणि हात सरळ करा. यानंतर दोन्ही पाय वरच्या बाजूला करा. लक्षात ठेवा की पाय पूर्णपणे सरळ असावेत.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner