Yoga Asanas To Boost Mental Health: धावपळीच्या जीवनात बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे व्यक्ती नको असतानाही, तणाव, नैराश्य आणि चिंतेने वेढलेली असते. यामुळे व्यक्ती अनेक गंभीर आजारांना बळी पडू शकतो. अशा वेळी योगामुळे व्यक्तीला निरोगी, फिट आणि दीर्घायुष्यासाठी तंदुरुस्त राहण्यास मदत होते. नियमित योगाभ्यास केल्याने एखाद्या व्यक्तीला तणाव, चिंता, नैराश्य यासारख्या समस्यांपासून मुक्ती मिळते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते. तसेच, रोजच्या कामावर देखील लक्ष केंद्रित होते. तुम्हीही तणाव, नैराश्य किंवा चिंता अशा कोणत्याही समस्येने त्रस्त असाल, तर ही २ योगासने तुम्हाला तुमच्या समस्येवर मात करण्यास मदत करू शकतात. योगा अनेक आजारांना तुमच्यापासून दूर ठेवण्यासाठी मदत करू शकतो. चला तर जाणून घेऊया...
संतुलनासन हे योग आसन मणिपुरा चक्राला उत्तेजन देते. यामुळे संपूर्ण शरीर सक्रिय होते. ज्यामुळे व्यक्तीच्या मनात सकारात्मकतेची भावना जागृत होते. या आसनाच्या नियमित सरावामुळे व्यक्तीच्या मनात आंतरिक संतुलन आणि सामंजस्याची भावना निर्माण होते. शरीराचा समतोल साधल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहते. हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम पोटावर झोपून आपले तळवे खांद्याच्या रेषेत खाली ठेवून शरीर आणि गुडघे उंचावावेत. हे करताना गुडघे सरळ तेवावेत. गुडघे आणि पाठीचा कणा सरळ रेषेत असल्याची खात्री करावी. आता मनगट सरळ ठेवून मान उंच करावी.
तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, वज्रासन हा ताण आणि चिंता दूर करण्याचा उत्तम सोपा उपाय आहे. हे आसन करताना व्यक्तीने रिलॅक्स राहावे. असे केल्याने छाती आणि ओटीपोटाच्या स्नायूंवर दबाव येण्याबरोबरच पचनक्रियाही सुधारते. हे आसन करताना हळू हळू श्वास घेतल्याने व्यक्तीचा ताण दूर होतो. हे आसन करताना सर्वप्रथम योगा मॅटवर बसून, जमिनीवर गुडघे टेकवा. हे करताना गुडघे मागे असावेत आणि नितंब टाचांवर ठेवलेले असावे. हे करत असताना दोन्ही पायांना एकमेकांना चिकटवून ठेवून, पाठीचा कणा सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. या अवस्थेत राहून दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू श्वास सोडा. डोके, मान आणि पाठीचा कणा सरळ रेषेत ठेवून हाताचे तळवे मांडीवर ठेवा. या स्थितीत थोडा वेळ बसून राहा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या