मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Yoga Mantra: किडनीवर परिणाम करतो मधुमेह, नियंत्रित ठेवण्यासाठी रोज करा हे योगासन

Yoga Mantra: किडनीवर परिणाम करतो मधुमेह, नियंत्रित ठेवण्यासाठी रोज करा हे योगासन

Hiral Shriram Gawande HT Marathi
May 31, 2023 08:19 AM IST

Yoga for Diabetes: मधुमेह हा सामान्य आजार असला तरी हाय शुगर लेव्हलमुळे अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही नियमितपणे काही योगासने करू शकता.

हलासन
हलासन (freepik)

Yogasanas to Control Diabetes: अनेक समस्यांना तोंड देण्यासाठी योग खूप फायदेशीर ठरू शकतो. अहवालांनुसार नियमितपणे योगासन केल्याने स्वादुपिंड म्हणजे पँक्रियाज आणि इन्सुलिन सुधारते. यासोबत योगामुळे तणाव कमी होतो आणि शरीरात लवचिकता वाढते. येथे काही योगासने आहेत जी तुम्हाला मधुमेहाची पातळी नियंत्रित करण्यास मदत करू शकतात.

१) वक्रासन

नियमितपणे वक्रासन केल्याने एब्स मजबूत आणि टोन्ड होतात. शरीर लवचिक बनवण्यासाठी तुम्ही हे आसन रोज करू शकता. यासाठी दंडासनामध्ये बसून पाय समोर पसरवा. त्यानंतर पायाची बोटे वरच्या बाजूला ठेवा आणि तळवे नितंबांच्या जवळ ठेवा आणि उजवा गुडघा वाकवा. मग हात पसरून दीर्घ श्वास घ्या. नंतर उजवा हात उजव्या नितंबाच्या मागे घ्या आणि जमिनीवर ठेवा. नंतर डाव्या हाताने उजवा घोटा धरा. त्याच वेळी डोके उजवीकडे वळवून उजव्या खांद्यावर पहा. हे आसन एका बाजूला केल्यानंतर दुसऱ्या बाजूने करा.

२) सर्वांगासन

हे आसन केल्याने रक्ताभिसरण नियंत्रित राहते. हे बद्धकोष्ठतेवर उपचार करते आणि केस गळणे कमी करते. हे आसन करण्यासाठी पाठीवर झोपावे. आता दोन्ही पाय जोडून वर करा. पाय ९० अंशांवर आल्यावर पाठीला हाताने आधार द्या. हे आसन करताना तुमच्या शरीराचा भार डोक्यावर आणि खांद्यावर असायला हवा.

३) हलासन

हे आसन पाचन तंत्राच्या अवयवांना मसाज करते आणि पचन सुधारण्यास मदत करते. हे केल्याने चयापचय वाढते. हे करण्यासाठी सर्वांगासनात राहा आणि नंतर जेव्हा तुमचे संपूर्ण भार खांद्यावर आणि डोक्यावर येईल तेव्हा हळूहळू पाय डोक्याच्या मागे आणा. असे केल्याने तुमचे पंजे जमिनीला स्पर्श करतील. ही मुद्रा धरा आणि नंतर सामान्य स्थितीत या.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग