Yoga Mantra: घोरण्याची समस्या दूर करतील ही योगासनं, नियमित केल्याने नक्की होईल फायदा
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Yoga Mantra: घोरण्याची समस्या दूर करतील ही योगासनं, नियमित केल्याने नक्की होईल फायदा

Yoga Mantra: घोरण्याची समस्या दूर करतील ही योगासनं, नियमित केल्याने नक्की होईल फायदा

Published Aug 02, 2024 07:08 AM IST

Yoga for Snoring: एखाद्या व्यक्तीच्या घोरण्यामुळे इतर लोकांना त्याचा त्रास होतो. घोरण्याची समस्या दूर करण्यासाठी ही योगासनं तुमची मदत करू शकतात.

भ्रामरी प्राणायाम
भ्रामरी प्राणायाम (freepik)

Yoga Poses for Snoring Problem: रात्री शांत झोप येणे किती गरजेचे आहे ना? पण जेव्हा आपल्या बाजूला झोपलेली व्यक्ती घोरायला लागते तेव्हा ही शांत झोप फक्त स्वप्न वाटते. अनेकांना घोरण्याची समस्या असते आणि त्यामुळे त्यांची आणि त्यांच्या आसपासच्या लोकांची झोप खराब होते. या समस्येवर योगासनांचा प्रभावी उपाय आहे. योगासन केवळ शारीरिक आरोग्यच सुधारत नाहीत तर मानसिक तणावही कमी करतात. तसेच, योगासनांचा श्वासोच्छ्वासावर सकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे, घोरण्याच्या समस्येवर योगासन एक प्रभावी उपाय ठरू शकतात. घोरण्याची समस्या दूर करण्यासाठी ही योगासनं नियमित केल्यास तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकता. जाणून घ्या ही कोणती योगासनं आहेत

 

सिंहासन

हे आसन करताना व्यक्तीच्या शरीराचा आकार सिंहासारखा दिसतो, म्हणून या आसनाला सिंहासन असे म्हणतात. सिंहासन करण्यासाठी सर्वप्रथम वज्रासनात बसून आपले दोन्ही हात जमिनीवर ठेवा आणि हाताची बोटे मागे वळून पायांच्या मध्ये सरळ ठेवा. आता दीर्घ श्वास घेऊन जीभ बाहेर काढा. हे करत असताना आपले दोन्ही डोळे उघडून जमिनीकडे पहा आणि शक्य तेवढे जास्त तोंड उघडा. त्यानंतर श्वास सोडताना सिंहाप्रमाणे गर्जना करा. ही क्रिया १५ वेळा गर्जनेसह करा. या आसनामुळे घोरण्याच्या समस्येपासून सुटका मिळू शकते.

भ्रामरी प्राणायाम

हे करताना भुंग्यासारखा आवाज येतो, म्हणूनच त्याला भ्रामरी प्राणायाम असे म्हणतात. हे आसन केल्याने केवळ मन शांत होत नाही तर आरोग्याशी संबंधित अनेक फायदेही मिळतात. हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम सुखासनाच्या आसनात बसा. आता दोन्ही हातांच्या अंगठ्याने कान बंद करा. आता तर्जनी कपाळावर ठेवून उरलेली बोटे डोळ्यांवर ठेवा. हे करत असताना हळू हळू तुमचा श्वास खोलवर घ्या आणि काही वेळ आत धरून ठेवा आणि नंतर आवाज करताना दोन्ही नाकपुड्यांमधून हळू हळू श्वास सोडा. लक्षात ठेवा श्वास सोडताना भुंग्यासारखा आवाज काढण्याचा प्रयत्न करा. हे आसन घोरण्याच्या समस्येवर मात करण्यास मदत करते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner