Yoga Mantra: केवळ निरोगी यकृत नाही तर अनेक आजारांपासून सुटका करतील ही योगासनं, नियमित करा-yoga mantra regular practice of these yoga poses will give healthy liver and cure many diseases ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Yoga Mantra: केवळ निरोगी यकृत नाही तर अनेक आजारांपासून सुटका करतील ही योगासनं, नियमित करा

Yoga Mantra: केवळ निरोगी यकृत नाही तर अनेक आजारांपासून सुटका करतील ही योगासनं, नियमित करा

Aug 05, 2024 07:42 AM IST

Yoga For Fatty Liver: योगासन आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर म्हटले जातात. यकृत निरोगी ठेवण्यासोबतच अनेक आजार दूर ठेवण्यासाठी कोणते योगासन उत्तम आहेत ते जाणून घ्या

निरोगी यकृतासाठी योगासन
निरोगी यकृतासाठी योगासन

Yoga Poses For Healthy Liver: शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी नियमित योगासन करणे खुप चांगले असते. आरोग्याची योग्य काळजी घेतली नाही तर अनेक समस्या उद्भवू शकतात. यातील एक समस्या म्हणजे लिव्हर खराब होणे. अनेक कारणांमुळे यकृत कमकुवत होते आणि नंतर कॅन्सर, सिरोसिस, फॅटी लिव्हरसारखे घातक आजार होऊ शकतात. यकृत निरोगी ठेवण्यासाठी आपल्या जीवनशैलीत काही बदल करण्यासोबतच काही योगासन करणे प्रभावी ठरते. हे काही योगासन नियमित केल्याने आपले यकृत तर निरोगी राहतेच शिवाय ते इतरही आजार दूर ठेवण्यास मदत करतात. ही कोणती योगासनं आहेत जाणून घ्या.

धनुरासन

या आसनाचा सराव केल्याने रक्त प्रवाह वाढू शकतो. याशिवाय पचनक्रिया सुधारते आणि ऊर्जा वाढते. हे आसन करण्यासाठी आपले हात बाजूला ठेवून पोटावर झोपा. आपले गुडघे वाकवा आणि आपले हात मागे घेऊन आपल्या घोट्याच्या बाहेरील कडा पकडा. शक्य असल्यास आपली छाती आणि खांदे जमिनीच्या वर उचला. पुढे पहा आणि हळू, खोल श्वास घ्या. या पोझमध्ये ३० सेकंद रहा आणि नंतर १-२ वेळा पुन्हा करा.

भुजंगासन

या आसनमुळे कोअर शक्ती, पाठीच्या कण्याची लवचिकता आणि रक्त प्रवाह सुधारतो. तणाव, पचन आणि श्वासोच्छवास सुधारण्यासाठी देखील हे प्रभावी आहे. हे आसन करण्यासाठी योगा मॅटवर पोटावर झोपा. हात बाजूला ठेवा. नंतर आपले हात खांद्याच्या बाजूला शरीराला लागून ठेवा. आपले डोके, छाती आणि खांदे श्वास घेत वर उचला. तुमची छाती उचलताना आणि विस्तृत करताना, तुमचे कोपर थोडेसे वाकवा. आता तुमची पाठ, पोट आणि मांड्या ताणून घ्या. ३० सेकंद या आसनात राहा. नंतर किमान १-३ वेळा पुन्हा करा.

अर्ध मत्स्येंद्रासन

हे आसन केल्याने तणाव कमी होतो आणि तुमच्या अंतर्गत अवयवांना चालना मिळते. हे आसन करताना आपल्या हिप्सना आधार देण्यासाठी उशीच्या काठावर बसू शकता. हे आसन करण्यासाठी आधी सरळ बसा. आता तुमचा उजवा पाय तुमच्या डाव्या नितंबाच्या बाहेरील बाजूस ठेवा. तुमचा उजवा गुडघा पुढे करा. तुमचा डावा पाय तुमच्या उजव्या मांडीच्या बाहेरील बाजूस आणा. तुमचा डावा हात तुमच्या मागे जमिनीवर ठेवा. आणि तुमचा उजवा हात तुमच्या डाव्या पायाच्या बाहेरच्या बाजूला ठेवा. शरीर हळू हळू फिरवा आणि दोन्ही खांद्यावर पहा. किमान १ मिनिट या स्थितीत रहा आणि नंतर दुसऱ्या बाजूने पुनरावृत्ती करा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग