मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Yoga Mantra: सतत बसल्यामुळे पाठ वाकली का? पोश्चर सुधारण्यासाठी रोज करा ही योगासनं

Yoga Mantra: सतत बसल्यामुळे पाठ वाकली का? पोश्चर सुधारण्यासाठी रोज करा ही योगासनं

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jan 19, 2024 08:59 AM IST

Yoga for Body Posture: आजकाल बहुतांश लोक बसून काम करतात. लॅपटॉप, कॉम्प्युटर, मोबाईलवर सतत पाहिल्याने खांदे वाकण्याची समस्या होते. बिघडलेले यामुळे शरीराचे पोश्चर नीट करण्यासाठी तुम्ही या योगासनांची मदत घेऊ शकता.

शलभासन
शलभासन (freepik)

Yogasana for Right Posture: हल्ली प्रत्येकाच्या कामाचा सर्वाधिक वेळ हा लॅपटॉप, कॉम्प्युटर, मोबाईलवर जातो. मोबाईल आणि कॉम्प्युटरवर सतत काम केल्यामुळे अनेकांना खांदे, पाठ वाकण्याच्या समस्येने ग्रासले आहे. चुकीच्या पोश्चरमुळे ही समस्या असल्याचे मानले जाते. हे दिसायलाही वाईट दिसते. शरीराचे पोश्चर सुधारण्यासाठी तुम्ही रोज काही योगासनांची मदत घेऊ शकतात. हे तुमच्या पाठीचे हाड परत योग्य आकारात येण्यास मदत करतील. विशेषतः मुलांनी या योगासनांचा नियमित सराव करावा. जेणेकरुन त्यांना लहानपणापासूनच खराब पोश्चरच्या समस्येला सामोरे जावे लागणार नाही. चला तर मग जाणून घेऊया कोणती योगासने आसन तुमचे पोश्चर सुधारू शकतात.

ताडासन

ताडासनामुळे खांदे आणि मणक्यामध्ये ताण निर्माण होतो. ज्यामुळे मुद्रा सुधारते. याशिवाय हे आसन पोट आणि नितंबांना टोनिंग करण्यास देखील मदत करते. हे आसन शरीराचे संतुलन राखण्यासही मदत करते. ताडासन करण्यासाठी प्रथम एका जागी उभे रहा. दोन्ही पाय खांद्याला समांतर पसरवा. त्यानंतर दोन्ही हात वरच्या बाजूला घेऊन तळवे एकमेकांकडे वळवा. नंतर तळवे उचलून पायाच्या बोटांवर उभे राहून शरीर हाताकडे खेचा. या ताणाने शरीरातील जडपणा दूर होऊन स्नायू मऊ होतात.

भुजंगासन

ज्या लोकांच्या खांद्याची हाडं सतत बसून मोबाईल फोन वापरल्यामुळे वाकतात त्यांनी भुजंगासनाचा सराव करावा. या आसनामुळे खांद्यावर ताण येतो. त्यामुळे पुढे वाकलेले खांदे योग्य स्थितीत येतात. भुजंगासन करण्यासाठी सर्वप्रथम पोटावर जमिनीवर झोपा. त्यानंतर शरीराला कंबरेपासून उचलून दोन्ही हातांनी आधार द्या. डोके वरच्या बाजूला ठेवा. त्यामुळे मानेलाही थोडासा ताण येतो. साधारण २० मोजेपर्यंत या आसनात रहा. सुरुवातीला कमी वेळेत सुरुवात करा आणि हळूहळू वेळ वाढवा.

शलभासन

हे आसन करण्यासाठी योगा मॅटवर पोटावर झोपा. नंतर हात बाजूला ठेवा. तळवे जमिनीवर आणि हनुवटी जमिनीला स्पर्श करणे आवश्यक आहे. शरीराला हळू हळू कंबरेवरून वर उचला. लक्षात ठेवा की या दरम्यान हात देखील एकत्र वर केले पाहिजेत. यासोबतच उजवा पायही वर करावा लागतो. काही वेळ या आसनात राहिल्यानंतर पुन्हा सामान्य स्थितीत या आणि नंतर डावा पाय उचलताना हाच क्रम पाळा. सुमारे ६-७ वेळा दीर्घ श्वास घेतल्यानंतर पुन्हा सामान्य व्हा. त्यानंतर दोन्ही पाय आणि कंबर एकत्र उचलण्याचा सराव करा. हे आसन केल्याने खांदे आणि कंबरेची स्थिती सुधारते.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग