Yogasana for Pimples and Natural Glow: शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी योगासन केली जातात. पण तुम्हाला माहीत आहे का योगासन फक्त आरोग्यासाठी नाही तर त्वचेसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे. अनेक लोकांना पिंपल्सची समस्या असते. पिंपल्समुळे तुमचे सौंदर्य खराब तर होतेच शिवाय तुमच्या त्वचेची नैसर्गिक चमक सुद्धा हरवते. पिंपल्सची समस्या दूर करण्यासाठी आणि चेहऱ्याची नैसर्गिक चमक वाढवण्यासाठी तुम्ही काही योगासनं करू शकता. जाणून घ्या कोणते आहेत हे योगासन
जर तुम्ही नेहमी तणावाखाली असाल तर तुम्हाला पिंपल्स होण्याची शक्यता जास्त असते. अशा परिस्थितीत बालासन करणे फायदेशीर ठरू शकते. बालासन तणाव आणि चिंता दूर करून हार्मोन्स संतुलित करण्यास मदत करते.
उत्तानासनामुळे शरीर ताणले जाते. लिव्हर आणि किडनीही निरोगी राहते. कधी-कधी जास्त ताण घेतल्याने चेहऱ्यावर मुरुमे येतात, अशा परिस्थितीत उत्तानासन तणाव कमी करून हार्मोन्स संतुलित करण्यास मदत करते. ज्यामुळे मुरुमांपासून सुटका होते.
कपालभाती पोटासाठी खूप फायदेशीर आहे. असे केल्याने शरीर डिटॉक्स होते आणि शरीरातील सर्व विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात. कपालभातीमुळे पचनक्रिया सुधारून रक्ताभिसरणही सुधारते. हे केल्याने त्वचेशी संबंधित समस्या दूर होतात. कपालभातीचा रोज सराव केला तर त्वचा पिंपल्स फ्री आणि सुंदर बनते.
प्राणायामाद्वारे श्वासावर नियंत्रण ठेवता येते. हे केल्याने तणाव दूर होतो. शरीराची उर्जा वाढते आणि शरीरात अधिक ऑक्सिजन पोहोचतो, ज्यामुळे शरीरातील सर्व विषारी घटक बाहेर पडतात. ज्यामुळे हार्मोन्स संतुलित राहतात आणि शरीरात ब्लड सर्कुलेशन देखील चांगले होते. यामुळे त्वचेचे पिंपल्स दूर होतात आणि त्वचा सुधारते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)