मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Yoga Mantra: गर्भाशय मजबूत ठेवण्यासाठी रोज करा ही योगासनं, ही आहे करण्याची योग्य पद्धत

Yoga Mantra: गर्भाशय मजबूत ठेवण्यासाठी रोज करा ही योगासनं, ही आहे करण्याची योग्य पद्धत

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jan 23, 2024 08:23 AM IST

Yoga for Uterus: महिलांना आपले गर्भाशय मजबूत आणि प्रजनन सिस्टम हेल्दी ठेवायची असेल तर या योगासनांची मदत घेऊ शकतात.

काउ फेस पोज
काउ फेस पोज (freepik)

Yoga Poses for Healthy Female Reproductive System: खराब जीवनशैली आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे बहुतेक महिलांना कमकुवत गर्भाशयाची समस्या भेडसावत आहे. या समस्येबाबत अनभिज्ञ असल्याने महिलांना या समस्येवर वेळेवर उपचार मिळू शकत नाहीत, ही चिंतेची बाब आहे. परिणामी गर्भधारणे दरम्यान महिलांमध्ये गर्भपात होण्याचा धोका लक्षणीय वाढतो. गर्भधारणेपासून ते प्रसूतीपर्यंत स्त्रीची गर्भधारणा निरोगी ठेवण्यासाठी गर्भाशयाचे निरोगी असणे अत्यंत आवश्यक आहे. ज्यामध्ये योग तुम्हाला मदत करू शकतो. नियमित योगा केल्याने महिला गर्भाशयाला मजबूत ठेवू शकतात.

गर्भाशयाला मजबूत करण्यासाठी योगासने

योनी मुद्रा

योनी मुद्रा गर्भाशयाला योग्यरित्या कार्यकरण्यास आणि प्रजनन क्षमता सुधारण्यास मदत करू शकते. ही मुद्रा करण्यासाठी सर्वप्रथम तुमची तर्जनी आणि अंगठा जोडून हात खाली नमस्काराच्या मुद्रेत ठेवा. तुमची करंगळी, मधले बोट आणि अनामिका हळूवारपणे दुमडून घ्या आणि तुमचा अंगठा आणि तर्जनी एकमेकांपासून दूर हलवा, डायमंड आकार तयार करा. या दरम्यान पाठीचा कणा सरळ ठेवून बसा आणि २० वेळा दीर्घ श्वास घ्या आणि सोडा.

काउ फेस पोज

महिलांच्या गर्भाशयात सुजलेल्या प्रोस्टेट ग्रंथी आणि अंडाशयासाठी काउ फेस मुद्रा फायदेशीर आहे. हे करण्यासाठी सर्वप्रथम सुखासन स्थितीत बसून आपल्या डाव्या पायाची टाच उजव्या नितंबाजवळ घ्या आणि उजवा पाय दुसऱ्या गुडघ्याजवळ डाव्या मांडीवर क्रॉस करून घ्या. आता तुमचा डावा गुडघा उजव्या गुडघ्याच्या वर ठेवा. हे करत असताना पुढे वाकून दोन्ही हात पुढे करा. १५ सेकंद या स्थितीत राहा आणि हे किमान ७ वेळा पुन्हा करा.

मालासन

मालासन तुमचे पेल्विक आणि नितंबाचे सांधे निरोगी ठेवते. हे करण्यासाठी सर्वप्रथम योगा चटईवर सरळ उभे राहा. पाठीचा कणा सरळ ठेवून दीर्घ श्वास घ्या आणि आपले गुडघे वाकवून शौच स्थितीत बसा. आता हळू हळू आपल्या मांड्या खांद्याच्या रुंदीपेक्षा किंचित जास्त पसरवा आणि दोन्ही हात जोडून घ्या. काही वेळ या आसनात राहा. ही मुद्रा १५ वेळा करा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel