Yoga Poses To Boost Energy: अनेक वेळा दिवसभर सुस्ती, आळस आणि थकवा जाणवत असतो. हे दूर करण्यासाठी फक्त चहा, कॉफी पिणे हा उपाय असू शकत नाही. तुम्ही तुमच्या रूटीनमध्ये काही योगासनांचा समावेश केला पाहिजे. दररोज ही योगासने केल्याने तुमची एनर्जी बूस्ट होण्यास मदत होईल. तसेच थकवा आणि आळस जाणवणार नाही.
नाडी मानवी शरीरातील सूक्ष्म ऊर्जा वाहिन्या आहेत, ज्या वेगवेगळ्या कारणांमुळे ब्लॉक होऊ शकतात. नाडी शोधन प्राणायाम हे श्वासोच्छवासाचे तंत्र आहे, जे या ब्लॉक एनर्जी चॅनलला साफ करण्यास मदत करते ज्यामुळे मन शांत होते. या तंत्राला अनुलोम-विलोम प्राणायाम असेही म्हणतात. नाडी शोधन प्राणायाम मनाला विश्रांती देण्यास मदत करतो आणि ध्यानस्थ अवस्थेत जाण्यासाठी तयार करतो. दररोज फक्त काही मिनिटे याचा सराव केल्याने मन शांत आणि प्रसन्न होते. यामुळे तणाव आणि थकवा दूर होण्यास मदत होते.
या आसनमुळे शरीरात चपळता येते आणि संपूर्ण पाठ, खांदे आणि हातांची लवचिकता आणि ताकद देखील वाढते. या योगासनामुळे पोटाच्या अवयवांना मसाज आणि टोन मिळतो तसेच पचनक्रिया सुधारते. हे पोट आणि आतड्यांना उत्तेजित करते, ज्यामुळे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल गॅसपासून मुक्त होते, मूत्राशय मजबूत होते आणि पाठीचा कणा ताणला जातो. दैनंदिन दिनक्रमात या आसनाचा समावेश करा.
खुर्चीवर बसणे खूप सोपे आणि आरामदायक वाटते परंतु काल्पनिक खुर्चीवर बसणे थोडे अवघड असू शकते. हे योगासन ऊर्जा केंद्रे उघडते, पाठीचा कणा, नितंब आणि छातीचे स्नायू आणि पाठीचा खालचा भाग आणि धड मजबूत करण्यास मदत करते. हे आसन मांडी, घोटा, पाय आणि गुडघ्याच्या स्नायूंना टोन करते.
हे आसन पाय आणि पाठीचा खालचा भाग मजबूत आणि निरोगी बनवते. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हे खूप फायदेशीर आहे. या आसनामुळे शरीरातील संतुलन सुधारते आणि स्टॅमिना वाढण्यास मदत होते. खांदे अकडण्याच्या समस्येमध्ये हे अत्यंत फायदेशीर आहे. दिवसभर एनर्जेटिक राहण्यासाठी हे आसन रोज करा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या