मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Yoga Mantra: मानेची चरबी कमी करण्यासाठी रोज करा ही २ योगासनं, जाणून घ्या करण्याची योग्य पद्धत

Yoga Mantra: मानेची चरबी कमी करण्यासाठी रोज करा ही २ योगासनं, जाणून घ्या करण्याची योग्य पद्धत

Hiral Shriram Gawande HT Marathi
Apr 13, 2024 08:18 AM IST

Yoga for Neck and Chin Fat: शरीरचे पोश्चर चांगले ठेवण्यासाठी आणि तंदुरुस्त दिसण्यासाठी मानेवरील चरबी कमी करणे महत्वाचे आहे. जर तुम्हालाही मानेवर जमा झालेली चरबी कमी करायची असेल तर तुमच्या रुटीनमध्ये या योगासनांचा समावेश करा.

Yoga Mantra: मानेची चरबी कमी करण्यासाठी रोज करा ही २ योगासनं, जाणून घ्या करण्याची योग्य पद्धत
Yoga Mantra: मानेची चरबी कमी करण्यासाठी रोज करा ही २ योगासनं, जाणून घ्या करण्याची योग्य पद्धत (freepik)

Yoga Poses To Reduce Neck and Chin Fat: लोक पोटाची चरबी कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करतात. परंतु जेव्हा मानेभोवती जमा झालेल्या चरबीचा प्रश्न येतो तेव्हा ते त्याकडे दुर्लक्ष करतात. मानेची चरबी आणि डबल चीन सामान्यतः 'टर्की नेक' म्हणून ओळखली जाते. मानेवरील चरबीचा कोणत्याही व्यक्तीच्या सौंदर्यावर परिणाम होऊ शकतो. शरीरचे पोश्चर चांगले ठेवण्यासाठी आणि फिट दिसण्यासाठी मानेवरील चरबी कमी करणे आवश्यक आहे. जर तुम्हालाही मानेवर जमा झालेली चरबी दूर करायची असेल तर तुमच्या रुटीनमध्ये या २ योगासनांचा समावेश करा. रोज केल्याने फरक दिसून येईल.

ट्रेंडिंग न्यूज

भुजंगासन

भुजंगासनाला इंग्रजीत कोब्रा पोज म्हणतात. भुजंगासनाच्या सरावाच्या वेळी शरीर नागाच्या आकारात राहते. या आसनाचा सराव केल्याने मानेवर आणि घशावरील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते आणि व्यक्तीचे वजन कमी होण्यास मदत होते. भुजंगासन करण्यासाठी प्रथम जमिनीवर योगा मॅट पसरवा आणि पोटावर झोपा. यानंतर डोक्याच्या दोन्ही बाजूंनी हात जमिनीवर ठेवा. आता तुमचे तळवे खांद्याच्या बरोबर आणा. दीर्घ श्वास घ्या आणि तुमचे हात जमिनीवर दाबा आणि तुमचे शरीर नाभीपर्यंत वर उचला. या क्रमाने प्रथम डोके, छाती आणि शेवटी पोट उचलावे. आता डोके सापाच्या फणा प्रमाणे वर करा. काही काळ या स्थितीत राहा आणि आधीच्या स्थितीत परत या. हे आसन तुम्ही ३ ते ७ वेळा करू शकता.

चक्रासन

चक्रासनाला इंग्रजीत व्हील पोझ असे म्हणतात. हे योगासन शरीराच्या खालच्या भागातील स्नायू मजबूत ठेवण्यासाठी खूप प्रभावी आहे. हे आसन नियमित केल्याने मानेवरील चरबी कमी होण्यास मदत होते. इतकंच नाही तर वाढता लठ्ठपणा दूर करण्यासाठी ते प्रभावी ठरू शकते. चक्रासन करण्यासाठी प्रथम आपल्या पाठीवर झोपा. आपले पाय नितंबाच्या पातळीवर ठेवून आपले गुडघे वाकवा. आता तळवे जमिनीवर ठेवून दोन्ही हात कानाच्या बाजूला अशा प्रकारे ठेवा की बोटे पायाकडे येतील. यानंतर श्वास घ्या आणि शक्य तितके नितंब आकाशाकडे वर उचला. श्वास सोडा आणि थांबा. आता पुन्हा एकदा श्वास घ्या आणि मान खाली लटकवताना हात आणि पाय जवळ आणण्याचा प्रयत्न करा. या आसनात थोडा वेळ श्वास घ्या आणि नंतर हळूहळू सामान्य स्थितीत या.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग