मराठी बातम्या  /  Lifestyle  /  Yoga Mantra: Malaika Arora Recommends 3 Asanas To Reduce The Belly Fat

Yoga Mantra: मलायका अरोरासारखी हवी स्लिम कंबर? करा हे ३ योगासने

मलायका अरोरासारखी स्लिम कंबर मिळवण्यासाठी योगासन
मलायका अरोरासारखी स्लिम कंबर मिळवण्यासाठी योगासन
Hiral Shriram Gawande • HT Marathi
May 21, 2023 09:10 AM IST

Yoga for Belly Fat: जर तुम्हालाही बॉलिवूडच्या हॉट अभिनेत्रींपैकी एक असलेल्या मलायका अरोरासारखी टोन्ड फिगर मिळवायची असेल, तर हे ३ योगा पोझ तुम्हाला मदत करू शकतात. या योगासनांच्या मदतीने तुम्ही तुमच्या कंबरेचा आकार कमी करू शकता.

Best Yoga Poses for Slim Waist: तासनतास एकाच जागी बसून काम केल्याने बहुतेक लोक पोटाची चरबी वाढल्याची तक्रार करतात. चुकीच्या जीवनशैलीमुळे आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळेही अनेक वेळा ही समस्या व्यक्तीला सतावते. पोट आणि कंबरेभोवती जमा होणारी अतिरिक्त चरबी केवळ तुमचा लूकच खराब करत नाही, तर आरोग्याच्या समस्याही निर्माण करू शकते. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला बॉलीवूडच्या हॉट अभिनेत्रीमध्ये समाविष्ट असलेली मलायका अरोरासारखी टोन्ड फिगर मिळवायची असेल, तर ही ३ योगासने तुमची मदत करू शकतात. या योगासनांच्या मदतीने तुम्ही तुमच्या कंबरेभोवतीची चरबी कमी करू शकता आणि सुटलेल्या पोटापासून मुक्त होऊ शकता.

ट्रेंडिंग न्यूज

Yoga Mantra: योगाभ्यास करताना चुकूनही करू नका या चुका, मिळेल पूर्ण फायदा

नौकासन

नौकासन केल्याने व्यक्तीच्या संपूर्ण शरीरात रक्ताभिसरण चांगले राहण्यासोबतच पोटावरील चरबी जाळण्यासही मदत होते. हे आसन केल्याने तुमचे कोअर मजबूत होतात आणि शरीराची लवचिकता सुधारते. हेआसन करण्यासाठी सर्वप्रथम जमिनीवर चटई टाकून पाठीवर झोपावे. आपले पाय सरळ आणि हात बाजूला ठेवा. आता दीर्घश्वास घेऊन आणि श्वास सोडत तुमचे शरीर आणि पाय जमिनीपासून ४५ अंश वर उचला. वर येताना, आपल्या शरीराचे वजन आपल्या नितंबांवर ठेवा. हे करत असताना लक्षात ठेवा की तुमची बोटे डोळ्यांशी जुळलेली असावीत आणि जमिनीला समांतर पसरलेली असावीत, हात पायाच्या दिशेने. काही वेळ या पोझमध्ये राहा आणि पोटाचे स्नायू घट्ट ठेवा. थोड्या वेळाने आधीच्या मुद्रेत परत या. हे आसन रोज ५ वेळा केल्याने फायदा होतो.

Yoga Mantra: नियमित करा ही २ योगासनं, श्वसनाच्या समस्या होतील दूर

कुंभकासन

कुंभकासनाच्या मदतीने पोटाची चरबी कमी करण्याचे तुमचे उद्दिष्ट पूर्ण करू शकता. कुंभकासन हा कॅलरी बर्न करण्याचा सर्वोत्तम व्यायाम आहे, जो कोअर मजबूत करण्यासोबतच स्टॅमिना वाढवण्यासही मदत करू शकतो. हे आसन करण्यासाठी मार्जरी आसनाने सुरुवात करा. यासाठी गुडघे नितंबाखाली आणि खांदे मनगटावर ठेवून डोके हलके ठेवा आणि जमिनीकडे पहा. आता दोन्ही हात जमिनीवर ठेवून एक पाय मागे घ्या आणि नंतर दुसरा पाय घ्या. तुमचे डोके जमिनीच्या समांतर आणून तुमचे हात जमिनीवर सरळ ठेवा. तुमचे वजन तुमच्या वरच्या हातांवर, पायांवर आणि पाठीवर समान रीतीने वितरित करा. आपले डोके सरळ ठेवताना आपले ग्लूट्स आणि अॅब्स घट्ट ठेवा. या स्थितीत राहून, पुढे पहा.

Yoga Mantra: वाढलेल्या वजनाची काळजी सोडा, या योगासनांनी करा वेट लॉस

भुजंगासन

भुजंगासन प्रामुख्याने पाठीवर, पोटावर परिणाम करते. हे आसन केल्याने पोटाची चरबी तर कमी होतेच, पण पाठीला मजबुती देण्यासोबत रक्ताभिसरणही सुधारते. ज्या लोकांची कंबर जाड आहे, पण बाकीचे शरीर पातळ आहे, त्यांनी नियमित भुजंगासन करावे. हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम पोटावर झोपा आणि पाय आणि पायाची बोटे जमिनीवर पसरवा. आता तळवे खांद्याच्या खाली जमिनीवर पसरवून, कोपर शरीराच्या बाजूला आणा. हे करत असताना हळूहळू डावीकडे घ्या. तुमचे खांदे तुमची छाती जमिनीवरून तुमच्या नाभीपर्यंत उचलून, डोके वर करा आणि ३० अंशांच्या कोनात डोके वर करा. या दरम्यान, तुमचे पेल्विक जमिनीवर ठेवा आणि लक्षात ठेवा की तुमचे डोके थोडे वरच्या दिशेने असावे. काही काळ या स्थितीत रहा. आता श्वास सोडा आणि हळूहळू पूर्वीच्या स्थितीत या. हे आसन दिवसातून २ ते ३ वेळा करा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग