Yoga Mantra: ताण तणाव असो वा डिप्रेशन दूर करण्यास मदत करते मकरासन, पाहा करण्याची योग्य पद्धत आणि फायदे-yoga mantra makarasana will help to get rid of stress and depression know how to do it and benefits ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Yoga Mantra: ताण तणाव असो वा डिप्रेशन दूर करण्यास मदत करते मकरासन, पाहा करण्याची योग्य पद्धत आणि फायदे

Yoga Mantra: ताण तणाव असो वा डिप्रेशन दूर करण्यास मदत करते मकरासन, पाहा करण्याची योग्य पद्धत आणि फायदे

Aug 21, 2024 07:42 AM IST

How To Do Makarasana: आजच्या काळात स्ट्रेस, डिप्रेशन या समस्या अनेकांना असल्याचे पाहायला मिळते. यापासून सुटका मिळवण्यासाठी मकरासन मदत करू शकते.

ताण तणाव आणि डिप्रेशन
ताण तणाव आणि डिप्रेशन (unsplash)

Benefits of Makarasana: सध्याच्या धकाधकीच्या जीवनात ताण तणाव तर खूप सामान्य झाला आहे. यासोबतच डिप्रेशनची समस्या सुद्धा अनेकांना भेडसावते. यापासून सुटका मिळवण्यासाठी लोक विविध उपाय करतात, ज्यात ध्यान, योगासन यांचा समावेश असतो. काही लोक डिप्रेशन दूर करण्यासाठी औषधोपचार देखील घेतात. पण तुम्ही औषधे न घेता सुद्धा स्ट्रेस, डिप्रेशन पासून सुटका मिळवू शकता. तुम्ही नियमितपणे मकरासन केले तर तुम्हाला आराम मिळू शकतो. 

मकरासन करताना व्यक्ती जमिनीवर पोटावर मगरीसारखा झोपतो. हे आसन करताना दोन्ही हात उशीसारखे डोक्याजवळ ठेवावे लागतात. या अवस्थेत मन शांत ठेवून शरीराचे अवयव शिथिल करावे लागतात. मकरासन केल्याने व्यक्तीला अनेक फायदे मिळतात. जाणून घ्या मकरासन करण्याची योग्य पद्धत आणि त्याचे फायदे.

 

मकरासन करण्याची योग्य पद्धत

मकरासन करण्यासाठी सर्वप्रथम पोटावर झोपा. उजवा पाय वाकवून सरळ दिशेने ४५ अंशांचा कोन करा. हे करताना, तुमचा डावा पाय सरळ स्थितीत असावा हे लक्षात ठेवा. ते करताना, तुमचा डावा गाल चटईवर ठेवा. आपला उजवा हात डाव्या गालाजवळ घ्या. या स्थितीत सुमारे १५ मिनिटे झोपा, दीर्घ आणि लांब श्वास घ्या.

मकरासन करण्याचे फायदे

- मकरासन केल्याने अनेक आजारांपासून मुक्ती मिळते. या आसनाच्या नियमित सरावाने उच्च रक्तदाब, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, टाइप २ मधुमेह आणि दमा यापासून आराम मिळू शकतो.

- नियमित मकरासन केल्याने पचनक्रिया सुधारते.

- हे आसन केल्याने शरीराचा थकवा आणि अंगदुखी दूर होण्यास मदत होते.

- पोटाचे स्नायू टोन होतात. तसेच बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी देखील उपयुक्त आहे.

- हे आसन केल्याने मानेतील ताठरपणासारख्या समस्या दूर होण्यास मदत होते.

- मकरासनाचा नियमित सराव केल्यास उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि मानसिक आजार या समस्या टाळता येतात.

- पाय दुखण्याची समस्या असेल तर हे आसन केल्याने या समस्येपासूनही सुटका मिळते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग