Yoga Mantra: कोणत्या आसनाने करावी योगासनाची सुरुवात? जाणून घ्या सर्वात आधी काय करावे-yoga mantra know with which asana to start yogasana and what to do first ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Yoga Mantra: कोणत्या आसनाने करावी योगासनाची सुरुवात? जाणून घ्या सर्वात आधी काय करावे

Yoga Mantra: कोणत्या आसनाने करावी योगासनाची सुरुवात? जाणून घ्या सर्वात आधी काय करावे

Mar 02, 2024 08:17 AM IST

Yoga Tips: तुम्हाला फिट राहायचे असेल तर दररोज योगासने करा. जाणून घ्या कोणत्या आसनाने योगासनाची सुरुवात करावी आणि ते करण्याचा योग्य मार्ग कोणता आहे.

योगासन
योगासन (unsplash)

Yogasana Tips: निरोगी आरोग्यासाठी फिटनेस खूप महत्त्वाचे आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला तंदुरुस्त ठेवता तेव्हा तुम्हाला इतर कामांमध्ये चांगले परिणाम मिळतील. फिटनेस मेंटेन ठेवण्यासाठी योग करणे सर्वोत्तम आहे. मात्र आजकाल अनेकजण योग्य ज्ञानाशिवाय योगासने करू लागतात. अनेक जण टीव्ही किंवा मोबाईल पाहताना योगासने करतात. मात्र काही वेळा चुकीच्या पद्धतीने आसन केल्याने समस्या निर्माण होऊ शकतात. अशा स्थितीत जाणून घ्या कोणत्या आसनाने योगासन (yogasana) सुरू करावे आणि योगा करण्याचा योग्य मार्ग कोणता आहे.

योगाची सुरुवात कशी करावी?

कोणतेही आसन सुरू करण्यापूर्वी प्राणायाम करणे महत्त्वाचे आहे. प्राणायाम वेगवेगळ्या प्रकारे करता येतो. प्रथम चटईवर बसा आणि नंतर भस्त्रिका प्राणायाम सुरू करा. त्यानंतर कपालभाती प्राणायाम करा आणि योगासन सुरू करा.

वॉर्मअप करा (warm-up)

योगसन करण्यापूर्वी वॉर्मअप करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर तुम्ही पहिल्यांदा योगासन करत असाल तर हे अजिबात स्किप करू नका. वॉर्मअप केल्याने स्नायूंच्या ताणासारख्या समस्या उद्भवत नाहीत. सोप्या भाषेत सांगायचे तर वॉर्म-अप तुमचे शरीर योगासने करण्यासाठी तयार करते. हे करण्यासाठी हात सरळ करा आणि नंतर दोन्ही बाजूंनी मनगट फिरवा. यासह तळहात उघडा आणि बंद करा. तुमच्या पाय समोरच्या दिशेने पसरवा आणि तुमच्या तळवे गोलाकार फिरवा. यासोबत पायाची बोटे पुढे आणि मागे हलवा.

कोणत्या आसनापासून सुरुवात करावी

जर तुम्ही योगा करण्यासाठी नवीन असाल आणि तुमच्या रूटीनमधून काही वेळ काढला असेल तर तुम्ही सूर्यनमस्कार (suryanamaskar) करू शकता. हा १२ आसनांचा समूह आहे. हे योगासन शरीराला योग्य आकार देण्यासाठी आणि मन शांत आणि निरोगी ठेवण्याचा योग्य मार्ग आहे. सूर्यनमस्कार करताना व्यक्ती ही १२ आसने करते

- प्रणाम आसन

- हस्तउत्तानासन

- हस्तपादासन

- अश्व संचलन आसन

- दंडासन

- अष्टांग नमस्कार

- भुजंगासन

- पर्वतासन

- अश्व संचलन आसन

- हस्तपादासन

- हस्तउत्थान आसन

- ताडासन

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner
विभाग