मराठी बातम्या  /  Lifestyle  /  Yoga Mantra: Know The Right Way Of Katichakrasana Yoga To Reduce Belly Fat

Yoga Mantra: पोटाची चरबी कमी करण्यासाठी नियमित करा कटिचक्रासन, जाणून घ्या योग्य पद्धत

बेली फॅट कमी करण्यासाठी योगासन
बेली फॅट कमी करण्यासाठी योगासन
Hiral Shriram Gawande • HT Marathi
May 30, 2023 08:13 AM IST

Yoga for Belly Fat: पोटावर जमा झालेली चरबी तुमचा लुक खराब करण्यासोबतच आरोग्याच्या अनेक समस्या सुद्धा निर्माण करते. तुम्ही योगासनाच्या मदतीने हे कमी करू शकता.

Katichakrasana to Reduce Belly Fat: बेली फॅट कमी करणे कोणत्या आव्हानापेक्षा कमी नसते. बरेच लोक चरबी काढून टाकण्यासाठी डायटिंग सुरू करतात, तर डाएटिंगमुळे तुमच्या शरीराचे एकूण वजन कमी होते. एखाद्या ठिकाणी जमा झालेली चरबी कमी करण्यासाठी त्या जागेवर दबाव आणावा लागतो. यासाठी योगासन हा सर्वोत्तम मार्ग आहे. यासाठी कटिचक्रासन हा उत्तम उपाय आहे. हे आसन तुम्हाला दररोज १० मिनिटे करावे लागेल.

ट्रेंडिंग न्यूज

अशा प्रकारे करा कटिचक्रासन

हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम सरळ उभे राहावे. त्यानंतर दोन्ही हात कंबरेवर ठेवून, शक्यतो कमरेपासून मागे वाकून तिथेच थांबा. आता मध्यम गतीने श्वास घ्या आणि डोळे बंद करून या स्थितीत उभे रहा. हे २-३ वेळा पुन्हा करा. आता यानंतर, या स्थितीत उभे रहा. यानंतर उजवा हात डाव्या खांद्यावर आणि डावा हात उजव्या खांद्यावर ठेवून प्रथम कंबरेपासून उजव्या बाजूने मागे वळा. मान वाकवून मागे वळून पहा. आता मध्यम श्वास घेताना डोळे बंद करा. आता त्याच प्रकारे कंबर डावीकडे वाकवा. तुमचे हातही या दिशेने असावेत. कंबर जोपर्यंत जमेल तेवढी वाकवून ठेवा. हे आसन ४-५ वेळा करा. आता शवासनात झोपून प्रथम दोन्ही हात समांतर क्रमाने पसरवा. नंतर उजवा पाय डावीकडे आणि डावा उजवीकडे हलवा. हे ४-५ वेळा पुन्हा करा.

कटिचक्रासनाचे फायदे

हे आसन केल्याने तुमची अतिरिक्त चरबी कमी होऊन तुमची कंबर सडपातळ तर होतेच, शिवाय जर तुम्हाला पचनाशी संबंधित समस्या असेल तर तुम्ही दररोज कटिचक्रासन केले पाहिजे. लिव्हर, किडनी आणि आतडे निरोगी ठेवण्यासाठी देखील हे खूप प्रभावी आहे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग