Yoga Mantra: पीरियडच्या दुखण्यापासून आराम देतील हे ३ योगासनं, नियमित सराव करा
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Yoga Mantra: पीरियडच्या दुखण्यापासून आराम देतील हे ३ योगासनं, नियमित सराव करा

Yoga Mantra: पीरियडच्या दुखण्यापासून आराम देतील हे ३ योगासनं, नियमित सराव करा

Published Jan 27, 2024 09:45 AM IST

Yoga for Period Cramps: बऱ्याच महिलांना मासिक पाळीदरम्यान वेदना होतात. अशा परिस्थितीत आराम मिळवून देण्यासाठी काही योगासने तुमची मदत करू शकतात. पीरियड्समध्ये या योगसनांचा नियमित सराव करा.

वक्रासन
वक्रासन (freepik)

Yogasana to Reduce Pain of Period Cramps: मासिक पाळी दरम्यान होणारे क्रॅम्प किंवा वेदना या प्रत्येक स्त्रीसाठी वेगळे असतात. काहींना कमी तर काहींना जास्त त्रास होतो. जर तुम्हाला सुद्धा पीरियड क्रॅम्पचा त्रास असेल, वेदनांमुळे या काळात आयुष्य थांबल्यासारखे वाटत असेल तर रोज या ३ योगासनांचा सराव करा. हे योगासन केल्याने मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम मिळतो. यासोबतच पाठदुखी, मान आणि डोकेदुखीपासून सुद्धा आराम मिळतो. या योगासनांचा नियमित सराव केल्याने फायदा होईल.

वक्रासन

दररोज वक्रासनाचा सराव केल्याने मासिक पाळीच्या तीव्र वेदनांपासून आराम मिळतो. या योगासनाने कंबरेच्या स्नायूंना आराम मिळतो आणि पोटदुखीमुळे होणाऱ्या क्रॅम्पपासून आराम मिळतो. हे आसन करण्यासाठी प्रथम योगा मॅटवर पाय पसरून बसा. उजवा पाय गुडघ्यात वाकवा आणि उजवा हात मागे घेऊन जमिनीवर ठेवा. डाव्या हाताने पायाचा गुडघा पकडून उजव्या बाजूला मागे वळून पाहण्याचा प्रयत्न करा. या दरम्यान कंबरेमध्ये ताण जाणवतो आणि शरीर एका बाजूला वाकलेले असेल हे लक्षात ठेवा. आता हीच प्रक्रिया डाव्या बाजूला पुन्हा करा.

पवनमुक्तासन

पिरियड्स क्रॅम्प्समुळे अनेक महिलांना गॅस आणि ब्लोटिंगचा त्रास होतो. त्यामुळे पोट आणि कंबर दुखते. मासिक पाळीच्या या समस्येमध्ये पवनमुक्तासन करणे फायदेशीर ठरते. यामुळे केवळ पोटालाच नाही तर गर्भाशय आणि त्याच्याशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो. याशिवाय हे आसन तणाव दूर करण्यास देखील मदत करते.

बद्धकोनासन

पीरियड्समुळे शरीराच्या खालच्या भागात जडपणा जाणवतो. अशा स्थितीत बद्धकोनासन शरीराला आराम देण्यास मदत करते. या आसनाचा दररोज ५ ते १० वेळा सराव केल्याने शरीर आणि मन शांत होण्यास मदत होते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner