Yoga Mantra: हेअर फॉलच्या समस्येपासून आराम देऊ शकतात ही योगासनं, ही आहे करण्याची योग्य पद्धत
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Yoga Mantra: हेअर फॉलच्या समस्येपासून आराम देऊ शकतात ही योगासनं, ही आहे करण्याची योग्य पद्धत

Yoga Mantra: हेअर फॉलच्या समस्येपासून आराम देऊ शकतात ही योगासनं, ही आहे करण्याची योग्य पद्धत

May 09, 2024 09:06 AM IST

Yoga for Hair Growth: जर तुम्हालाही हेअर फॉलचा त्रास होत असेल तर या २ योगासनांची मदत घ्या. ही योगासने टाळूमध्ये रक्ताभिसरण वाढवून केस दाट, लांब आणि मजबूत ठेवण्यास मदत करतात.

Yoga Mantra: हेअर फॉलच्या समस्येपासून आराम देऊ शकतात ही योगासनं, ही आहे करण्याची योग्य पद्धत
Yoga Mantra: हेअर फॉलच्या समस्येपासून आराम देऊ शकतात ही योगासनं, ही आहे करण्याची योग्य पद्धत

Yoga Asanas to Stop Hair Fall: आजकाल शरीरात पोषक तत्वांची कमतरता, प्रदूषण आणि तणावामुळे बहुतेक लोक केस गळण्याच्या समस्येने त्रस्त आहेत. चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यात लांब, दाट केस महत्त्वाची भूमिका बजावतात. पण केसांच्या वाढीसाठी आणि आरोग्यासाठी स्काल्प निरोगी असणे देखील खूप महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हीही केस गळतीने त्रस्त असाल तर या २ योगासनांची मदत घ्या. ही योगासने टाळूमध्ये ब्लड सर्कुलेशन वाढवून केस दाट, लांब आणि मजबूत ठेवण्यास मदत करू शकतात. केस गळती थांबवण्यासाठी आणि केसांच्या वाढीसाठी कोणते दोन योगासन करावे आणि ते करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या.

शष्कासन

शष्कासन याला इंग्रजीत रॅबिट पोज असेही म्हणतात. हे आसन हार्मोन्स संतुलित करते आणि टाळूमध्ये ब्लड सर्कुलेशन वाढवते. ज्यामुळे केस गळतीपासून आराम मिळतो. हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम योगा मॅटवर गुडघे वाकवून उभे राहा आणि डोके इतके पुढे वाकवा की डोके गुडघ्यांना स्पर्श करू लागेल. यानंतर डोक्याचा वरचा भाग चटईवर ठेवा आणि हात सरळ ठेवताना घोट्याला हाताने पकडण्याचा प्रयत्न करा. काही वेळ या स्थितीत राहा आणि दीर्घ श्वास घ्या. नंतर पूर्व स्थितीत या.

शीर्षासन

शीर्षासनाला हेडस्टँड पोझिशन असेही म्हणतात. हे आसन केल्याने डोक्यातील रक्तप्रवाह सुधारतो, ज्यामुळे केस गळणे आणि पातळ होण्याची समस्या दूर होते. या आसनामुळे केसांची चांगली वाढ होण्यासोबतच डोक्यात रक्त प्रवाह चांगला होण्यास मदत होते. या आसनामुळे केस पांढरे होण्याची समस्याही दूर होते. केसांशी संबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये शीर्षासनाचा समावेश करू शकता.

हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम दोन्ही हातांची बोटे जोडून डोक्याच्या मागे घ्या. आता खाली वाकून आपले डोके जमिनीवर ठेऊन, तोल सांभाळत आपले पाय हळू हळू वर न्या. लक्षात ठेवा की हे करत असताना तुम्हाला पूर्णपणे उलटे म्हणजेच डोक्यावर उभे राहावे लागेल. काही काळ या स्थितीत राहिल्यानंतर विश्रांती घ्या. हे आसन करताना लक्षात ठेवा की आसन करताना शरीराचा समतोल राखणे महत्त्वाचे आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही हे आसन भिंतीचा आधार घेऊन देखील करू शकता.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner