मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Yoga Mantra: वजन कमी करण्यासाठी योगासन करताय? आधी लक्षात ठेवा या ५ गोष्टी!

Yoga Mantra: वजन कमी करण्यासाठी योगासन करताय? आधी लक्षात ठेवा या ५ गोष्टी!

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jan 25, 2023 08:27 AM IST

जर तुम्ही योगा करण्यासाठी नवीन असाल आणि तुम्हाला योगाच्या मदतीने वजन कमी करायचे असेल तर हे महत्त्वाचे नियम जाणून घ्या.

योगा टिप्स
योगा टिप्स

Yoga Tips for Weight Loss: वजन कमी करण्यासाठी योग हा सर्वोत्तम मार्ग आहे. योगा करणे हे जिम किंवा हिट वर्कआउटपेक्षा वेगळे आहे. कारण योगामध्ये सर्वांगीण आणि आध्यात्मिक दृष्टीकोन आहे. जेव्हा तुम्ही योगासने सुरू कराल तेव्हा तुमच्या मनात अनेक प्रश्न येतील. याने फायदा होईल का? मला योगा करता येईल का? मला दुखापत होईल का? असे अनेक प्रश्न तुमच्या मनात निर्माण होतील. म्हणूनच योगासन सुरू करण्यापूर्वी हे नियम जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

योग सुरू करण्यापूर्वी लक्षात ठेवा या ५ टिप्स

१. साध्या आसनांनी सुरुवात करा

केवळ योगच नाही तर प्रत्येक गोष्टीत तुम्ही सहज सुरुवात केली पाहिजे आणि हळूहळू जटिलतेकडे वळले पाहिजे. तुमच्या स्नायूंना व्यायामाची सवय नसते. अशा परिस्थितीत तुम्ही सुरुवातीला अवघड आसने करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला दुखापत होऊ शकते. सोप्या आसनांनी सुरुवात केल्याने तुम्हाला दुखापत टाळण्यास मदत होते आणि आगामी आसनांसाठी तुमचे स्नायू तयार होतात. सुखासन, दंडासन आणि बद्धकोनासन यांसारख्या बसलेल्या आसनांनी सुरुवात करा. यानंतर ताडासन, वृक्षासन, हस्तुथासन आणि त्रियक ताडासन करावे. सुर्यनमस्कारही सुरुवातीला हळूहळू करावा.

२. प्रथम वॉर्म अप आहे गरजेचे

एस्पर्ट सांगतात की, नेहमी लहान व्यायामाने सुरुवात करा. यात स्ट्रेचिंग, मान आणि हात फिरवणे आणि सांधे यांना वॉर्म अप होते. थोडे हॉप्पिंग करावे किंवा चालावे. यामुळे तुमचे शरीर व्यायामासाठी तयार होईल. हिमालय प्रणाम हा देखील एक चांगला सूक्ष्म व्यायाम आहे.

३. प्राणायाम शिका

प्राणायाम म्हणजे श्वासावर नियंत्रण ठेवायला शिकणे. योगातील खरे आश्चर्य म्हणजे श्वास घेणे. जर तुम्ही तुमच्या श्वासावर नियंत्रण ठेवायला शिकलात तर तुम्ही अर्धा योग शिकलात. यासाठी भस्त्रिका प्राणायाम करा. हा प्राणायाम करण्यासाठी पद्मासन किंवा सुखासनासारख्या कोणत्याही आरामदायी आसनात बसा. आता तुमच्या श्वासोच्छवासाचे आणि श्वास सोडण्याचे प्रमाण १:१:१ असले पाहिजे, म्हणजेच तुम्ही १० सेकंद श्वास घेत असाल तर १० सेकंद आत श्वास रोखून धरा आणि १० सेकंद हळू हळू श्वास सोडा.

४. योगा करण्यापूर्वी योग्य कपडे निवडा

कोणताही व्यायाम करताना, तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की तुम्ही खूप घट्ट कपडे घालू नयेत ज्यामध्ये तुम्हाला हालचाल करताना त्रास होईल. खूप सैल कपडे घालू नका जे इकडे तिकडे अडकतील. कपडे आरामदायक असणे देखील खूप महत्वाचे आहे. योगादरम्यान सुती कपडे घालावेत. कारण घाम येतो आणि सिंथेटिक कपड्यांमध्ये घाम सुकत नाही.

५. योगा करण्यापूर्वी काहीही हेवी खाऊ नका

हा नियम प्रत्येक व्यायामाला लागू होतो. कोणत्याही व्यायामापूर्वी काही खाऊ नये. योग जरी रिकाम्या पोटी केला पाहिजे, पण जर ते शक्य नसेल, तर जेवण आणि योगामध्ये किमान ९० मिनिटांचे अंतर असावे. योगासन सुरू करण्यापूर्वी या नियमांची काळजी घेतल्यास तुम्हाला कोणत्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग