Health Benefits of Mandukasana: दीर्घकाळ बसून राहणे किंवा गतिहीन जीवनशैली या दोन्ही गोष्टींमुळे लोकांच्या पोटावरील चरबी वाढण्यासोबतच मधुमेहासारखे आरोग्याचे अनेक गंभीर धोके निर्माण होतात. जर तुम्हालाही तुमच्या बिझी लाइफस्टाइल रुटीनमुळे अशा समस्येला सामोरे जावे लागत असेल तर आज आम्ही तुम्हाला एक असे योगासन सांगणार आहोत जे तुम्हाला मधुमेह आणि पोटाच्या इतर अनेक समस्यांबरोबरच बेटी फॅट कमी करण्यास मदत करू शकते. या आसनाचे नाव आहे मांडूकासन. हे आसन केल्याने तुम्हाला अनेक समस्यांपासून सुटका मिळू शकते. जाणून घ्या मंडुकासन कसे करावे आणि त्याचे फायदे
मंडुकासन फ्रॉग पोज म्हणूनही ओळखले जाते. हे आसन मधुमेह आणि पोटाच्या आजारांवर रामबाण उपाय मानले जाते. मंडुकासन करताना शरीर बेडूकासारखे दिसते. ज्यांना अनेकदा पोटाच्या समस्येचा त्रास असतो, त्यांच्यासाठी हे योगासन एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. या आसनाचा नियमित सराव केल्यास गॅस, अपचन आणि पोट फुगणे यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
मंडुकासन करण्यासाठी सर्वप्रथम वज्रासनात बसून मुठी बांधून आपल्या नाभी आणि मांडीजवळ अशा प्रकारे ठेवावी की मुठी उभी राहील आणि बोटे पोटाकडे असतील. आता श्वास सोडताना पुढे वाका. हे करत असताना आपली छाती अशा प्रकारे खाली आणा की ती मांड्यांवर स्थिरावते. नाभीवर जास्तीत जास्त दाब पडेल अशा प्रकारे तुम्ही पुढे वाका. हे करत असताना डोकं आणि मान उंचावून डोळे समोर ठेवा. हे करत असताना हळूहळू श्वास घेत राहा आणि श्वास सोडत राहा. यानंतर श्वास घेत आपल्या सामान्य स्थितीत परत या. असे करून तुम्ही एक चक्र पूर्ण कराल. सुरवातीला हे आसन तुम्ही तीन ते पाच वेळा करू शकता.
मंडुकासनाच्या नियमित सरावामुळे पोटावर दबाव येऊन सुटलेले पोट कमी होण्यास मदत होते. हे आसन केल्याने पोटाचे स्नायू टोन होतात आणि पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते.
मधुमेहाच्या रुग्णांना मंडुकासन केल्याने खूप फायदा होतो. याचा नियमित सराव केल्याने शरीरात इन्सुलिनचे उत्पादन योग्य प्रकारे होते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
नियमित मंडुकासन केल्याने मासिक पाळीतील वेदना आणि क्रॅम्प या समस्येपासून महिलांना आराम मिळू शकतो.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या