Yoga Mantra: पीरियड्समध्ये होणाऱ्या हेवी ब्लीडिंगपासून आराम देतील ही योगासनं, वेदनाही होतील दूर-yoga mantra here are best yoga poses for heavy periods and menstruation ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Yoga Mantra: पीरियड्समध्ये होणाऱ्या हेवी ब्लीडिंगपासून आराम देतील ही योगासनं, वेदनाही होतील दूर

Yoga Mantra: पीरियड्समध्ये होणाऱ्या हेवी ब्लीडिंगपासून आराम देतील ही योगासनं, वेदनाही होतील दूर

Sep 23, 2024 10:14 AM IST

Yoga for Menstruation: मासिक पाळीच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी महिला कधी कधी औषधांचा आधार घेतात. पण काही काळानंतर ही समस्या परत येते. तुम्हीही या समस्येने त्रस्त असाल तर या दोन योगासनांचा आपल्या रूटीनमध्ये नक्की समावेश करा

बालासन - हेवी पीरियड्ससाठी योगासन
बालासन - हेवी पीरियड्ससाठी योगासन

Yoga Poses for Heavy Periods: बहुतेक स्त्रिया मासिक पाळीदरम्यान हेवी ब्लीडिंगमुळे त्रस्त असतात. स्त्रियांना होणाऱ्या या हेवी ब्लीडिंगमुळे त्यांच्या शरीरात लोहाची कमतरता तर होतेच, शिवाय अशक्तपणा, चक्कर येणे आणि कधीकधी गर्भधारणा करण्यासही त्रास होतो. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी महिला अनेकदा औषधांचा आधार घेतात, पण काही काळानंतर ही समस्या परत येते. तुम्हीही या समस्येने त्रस्त असाल तर या दोन योगासनांचा आपल्या दिनक्रमात नक्की समावेश करा.

पीरियड्समध्ये योगासन करावे का?

मासिक पाळीच्या आधी आणि नंतर योगा केल्याने पीरियड्सशी संबंधित अनेक समस्या दूर होऊ शकतात. मासिक पाळीचे पहिले एक किंवा दोन दिवस योगा करणे टाळण्याचा सल्ला दिला जातो. असे असूनही, अशी अनेक योगासने आहेत, जी मासिक पाळीदरम्यान हेवी ब्लीडिंग, वेदना आणि क्रॅम्प्स दूर करण्यासाठी केली जाऊ शकतात.

सुखासन

सुखासन हे एक योग मुद्रा आहे, ज्याला सोपे आसन देखील म्हणतात. 'सुखासन' हा शब्द 'सुखम' या संस्कृत शब्दापासून तयार झाला आहे ज्याचा अर्थ 'आनंद' असा होतो. सुखासन केल्याने माणसाला आनंद होतो. योग तज्ञ अनेकदा लोकांना या आसनात बसून जेवण करण्याचा सल्ला देतात. सुखासन हे बसण्याचे आसन आहे. सुखासन करण्यासाठी सर्वप्रथम योगा मॅटवर पाय पसरून बसा. हे करत असताना आपली पाठ सरळ ठेवा आणि दोन्ही पाय आलटून पालटून गुडघ्यांपासून आतल्या दिशेने वळवा. गुडघे बाहेरच्या बाजूला ठेवा आणि पाय ओलांडून बसा. आता पाय रिलॅक्स करून बसा. गुडघे जमिनीला स्पर्श करत राहतील हे लक्षात ठेवा. हे आसन करताना आपली कंबर, मान, डोके आणि पाठीचा कणा सरळ राहील याची विशेष काळजी घ्या. आता डोळे बंद करून दीर्घ श्वास घ्या आणि मन शांत ठेवा. एक मिनिट या आसनात राहा. हे आसन ३ वेळा करा.

बालासन

याला चाइल्ड पोज असे देखील म्हणतात. हे करण्यासाठी प्रथम योगा मॅटवर गुडघ्यावर बसा. यानंतर आपले दोन्ही गुडघे आणि टाच एकत्र जोडा. गुडघे हळू हळू शक्य तितके बाहेरच्या दिशेने पसरवा. दीर्घ श्वास घ्या आणि पुढे वाका. हे करत असताना दोन्ही मांड्यांच्या मध्ये पोट आणा आणि नितंब आकुंचन पावताना कमरेचा मागचा भाग नाभीकडे ताणण्याचा प्रयत्न करा. यानंतर डोके आणि मान थोडी मागे उचलण्याचा प्रयत्न करा. या आसनात पेल्विसचा भाग रिलॅक्स अवस्थेत असतो. हे आसन २ ते ३ मिनिटे करा. या आसनात गर्भाशयाच्या भिंतीमध्ये आकुंचन निर्माण होते. ज्यामुळे मासिक पाळीच्या वेदना आणि क्रॅम्प्सपासून आराम मिळतो.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner
विभाग