मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Yoga Mantra: बेली फॅटपासून सुटका हवी? फक्त १० मिनिट करा 'हे' योगासन

Yoga Mantra: बेली फॅटपासून सुटका हवी? फक्त १० मिनिट करा 'हे' योगासन

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jan 20, 2023 08:13 AM IST

10 Minutes Yoga: वजन वाढण्यासोबतच बेली फॅटची समस्या खूपच कॉमन झाली आहे. पोटाची वाढलेली चरबी कमी करणे आव्हानापेक्षा कमी वाटत नाही. पण टेन्शन घेऊ नका. तुम्ही हे काही योगासन फक्त १० मिनिट केल्याने बेली फॅटपासून सुटका मिळवू शकता.

भुजंगासन
भुजंगासन

Yoga Poses for Belly Fat: बदलेल्या जीवनशैलीमुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू लागल्या आहेत. अशा परिस्थितीत लोक शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. आजकाल प्रत्येक जण आपल्या पोटाची चरबी म्हणजेच बेली फॅट कमी करण्यासाठी अनेक गोष्टी फॉलो करत असतो. लोक व्यायाम आणि विविध डायट करुन पोट कमी करण्याचा प्रयत्न करतात. अशा परिस्थितीत योगा तुमची खूप मदत करू शकतो. हे योगासन तुमचे बेली फॅट कमी करण्यासोबतच इम्युनिटी बूस्ट करण्यात सुद्धा मदत करते. शरीर लवचिक आणि पोट फ्लॅट करण्यासाठी तुम्ही हे योगासन करू शकता.

मंडूकासनः बेली फॅट कमी करण्यासाठी मंडूकासन म्हणजेच फ्रॉग पोज खूप प्रभावी आहे. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीराला चांगले पोषण मिळण्यास मदत होते. यासाठी प्रथम वज्रासनाच्या मुद्रेत बसून मुठी बंद करा आणि अंगठे बाहेरच्या बाजूला ठेवा. यानंतर पोट आतून खेचा आणि मुठी नाभीवर ठेवा. शेवटी हळूहळू श्वास घेत घेत वरच्या दिशेने या.

भुजंगासनः भुजंगासन शरीरातील लवचिकता आणि फुफ्फुस उघडण्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे करण्यासाठी, सर्व प्रथम आपल्या पोटावर चटईवर झोपा. आता हात खांद्याच्या खाली जमिनीवर ठेवा. यानंतर छातीला कंबरेपासून वर उचला आणि शक्य तितक्या मागे डोके न्या. या पोझमध्ये श्वास घ्या आणि छाती, खांदे, कंबर इत्यादींमध्ये ताण फील करा. शेवटी, श्वास सोडा आणि सामान्य स्थितीत परत या.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग