Yoga For Knee Pain: केवळ ज्येष्ठ लोकांनाच नाही तर आजकाल कमी वयात सुद्धा गुडघेदुखीची समस्या उद्भवते. त्यातही अनेक लोकांना पावसाळ्यात ही समस्या आणखी वाढते. गुडघेदुखी दूर करण्यासाठी व्यायाम करणे आवश्यक आहे. तुम्हाला जीममध्ये जाणे शक्य नसेल किंवा हेवी एक्सरसाईज करू शकत नसाल तर काळजी करू नका. तुम्ही घरच्या घरी काही योगासन करून या समस्येपासून सुटका मिळवू शकता. तुमच्या रोजच्या रूटीनमध्ये या योगासनांचा समावेश केल्याने तुम्हाला गुडघेदुखीपासून आराम मिळेल. चला तर मग जाणून घ्या गुडघेदुखीची समस्या दूर करण्यासाठी कोणते योगासन करावे.
त्रिकोनासन केल्याने मसल्स पेनपासून आराम मिळतो. हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम सरळ उभे राहा. हे आसन करत असताना गुडघे वाकवू नका, ताठ सरळ उभे रहा. आता पायांमध्ये सुमारे दोन फूट अंतर ठेवा. दीर्घ श्वास घ्या आणि शरीर उजवीकडे वाकवा. डावा हात वर घेऊन कानाला लावा. डाव्या हाताच्या बोटांवर डोळे स्थिर करा. काही सेकंद या स्थितीत राहण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर सामान्य स्थितीत या. आता डावीकडे वाकून हीच प्रक्रिया पुन्हा करा.
गुडघे मजबूत करण्यासाठी आणि वेदना दूर करण्यासाठी हे आसन खूप फायदेशीर म्हटले जाते. हे आसन करण्यासाठी जमिनीवर सरळ उभे राहा. यानंतर उजवा गुडघा वाकवून डाव्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करा. नंतर उजवा पाय डावीकडे वळवून मागे घ्या. या दरम्यान उजवी मांडी डावीकडे ठेवा. या आसनात दोन्ही हात पुढे करा. दोन्ही हातांच्या कोपरांना वाकवून क्रॉस करा. हातांना क्रॉस करताना उजवा हात डावीकडे ठेवा.
हे आसन केल्याने पायांच्या स्नायूंना बरीच शक्ती मिळते. त्यामुळे गुडघेदुखीमध्ये खूप आराम मिळतो. हे आसन नेहमी रिकाम्या पोटी केले पाहिजे. लक्षात ठेवा की हे किमान पाच मिनिटे सुमारे १० वेळा करा आणि हे दिवसातून किमान २ वेळा करा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)