मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Yoga Mantra: निरोगी आणि सुंदर डोळ्यांसाठी करा हे योगासन, रोज केल्याने मिळेल फायदा

Yoga Mantra: निरोगी आणि सुंदर डोळ्यांसाठी करा हे योगासन, रोज केल्याने मिळेल फायदा

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 13, 2024 08:32 AM IST

Yoga for Eyes: डोळे हा महत्त्वाचा अवयव आहे. त्याची योग्य काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्हाला सुंदर आणि निरोगी डोळे हवे असतील तर तुम्ही रोज हे योगासन केले पाहिजे.

सर्वांगासन
सर्वांगासन

Yoga Poses for Healthy and Beautiful Eyes: आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य टिकवण्यात डोळ्यांचा मोठा हात असतो. पण हे डोळे कमजोर किंवा थकलेले असतील तर चेहऱ्याचा तेज देखील कमी होऊ लागतो. तुम्हालाही तुमच्या चेहऱ्याचा आणि डोळ्यांचा तेज सुंदर आणि निरोगी ठेवायचा असेल, तर तुमच्या रूटीनमध्ये या योगासनांचा समावेश करा. या योगासनांचा नियमित सराव करून तुम्ही तुमचे डोळे निरोगी आणि सुंदर बनवू शकता. चला तर जाणून घ्या कोणते योगासन करावे

सर्वांगासन

सर्वांगासन करण्यासाठी सर्वप्रथम योगा मॅटवर शवासनात झोपा. यानंतर दोन्ही हात मांड्या आणि तळवे जमिनीवर ठेवून, पाय गुडघ्यांपासून वाकवा आणि पाठ खांद्यापर्यंत उचला. दोन्ही हात कमरेच्या खाली ठेऊन शरीराच्या उंचावलेल्या भागाला आधार देत हनुवटी छातीला चिकटवा. हे करत असताना सतत श्वास घेत राहा. यानंतर पाय गुडघ्यातून वाकवून कपाळाजवळ परत आणताना हात जमिनीवर ठेवून हळूहळू शरीर आणि पाय शवासनामध्ये आणा. हे आसन करताना डोळे उघडे ठेवा. हे आसन केल्याने डोळ्यांचा तेज वाढतो आणि व्यक्तीची चिडचिडही दूर होते.

प्राणायाम

प्राणायाम करण्यासाठी व्यक्तीने पद्मासन आणि सिद्धासनाच्या आसनात बसावे. असे केल्याने मन स्थिर राहण्यासोबतच दृष्टीही चांगली राहते. रोज प्राणायाम केल्याने आरोग्याचे इतरही अनेक फायदे मिळतात.

शवासन

शवासन करण्यासाठी सर्वप्रथम योग मॅटवर पाठीवर शांतपणे झोपावे. यानंतर आपले पाय सैल सोडून, आपले खांदे शरीराच्या जवळ ठेवा. हे करत असताना तुमचे शरीर जमिनीवर पूर्णपणे स्थिर होऊ द्या. हे आसन केल्याने शरीराचा थकवा दूर होण्यासोबतच डोळ्यांनाही आराम मिळतो.

डोळ्यांच्या आरोग्यासाठी लक्षात ठेवा या महत्त्वाच्या गोष्टी

- मान सरळ ठेवून, डोळ्यांचे बुबुळ आधी ४-६ वेळा वर-खाली आणि नंतर उजवीकडे-डावीकडे हलवा. यानंतर उजवीकडून डावीकडे क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज ४ ते ६ वेळा फिरवा.

- डोळे फिरवताना तळहाताच्या मधला भागाने काही वेळ डोळे झाकून ठेवा. असे केल्याने डोळ्यांचे स्नायू मजबूत राहतील.

- कॉम्प्युटर किंवा लॅपटॉवर काम करत असताना, दर १० मिनिटांनी किमान २० फूट दूर पहा. यामुळे तुमच्या डोळ्यांची दूरची दृष्टी कायम राहील.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग