Yoga Mantra: पिंपल्स आणि एक्नेच्या समस्येने त्रस्त आहात का? रोज करा ‘या’ योग मुद्रा, मिळेल आराम
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Yoga Mantra: पिंपल्स आणि एक्नेच्या समस्येने त्रस्त आहात का? रोज करा ‘या’ योग मुद्रा, मिळेल आराम

Yoga Mantra: पिंपल्स आणि एक्नेच्या समस्येने त्रस्त आहात का? रोज करा ‘या’ योग मुद्रा, मिळेल आराम

Published Jul 24, 2024 10:10 AM IST

Yoga for Glowing Skin: चेहऱ्यावरील एक्ने आणि पिंपल्सने त्रास होत असेल तर दररोज योगासने करण्याचा सराव करा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर चमक येईल तसेच मुरुम दूर होतील.

पिंपल्स आणि एक्ने दूर करण्यासाठी योग मुद्रा
पिंपल्स आणि एक्ने दूर करण्यासाठी योग मुद्रा (unsplash)

Yoga Mudra for Pimples and Acne: चेहऱ्यावर पिंपल्स आणि एक्ने येण्यास अनेक कारणे कारणीभूत असतात. अनेकदा चुकीच्या खाण्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात. तसेच हार्मोनल असंतुलन, ताणतणाव, स्वच्छतेचा अभाव, औषधे हे सुद्धा कारण आहे. ज्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स आणि एक्ने येऊ लागतात. एक्ने आणि पिंपल्सपासून सुटका मिळवण्यासाठी अनेक वेळा फक्त योग्य स्किन केअर फायदेशीर ठरत नाही. तर काही योगासनांचा सराव करून तुम्ही वेगवान परिणाम मिळवू शकता. हे योगासन रोज केल्याने चेहऱ्यावर चमक येते, तसेच एक्ने आणि पिंपल्स दूर होतात. चला तर मग जाणून घ्या ग्लोइंग स्किन मिळवण्यासाठी आणि पिंपल्स, एक्ने दूर करण्यासाठी कोणते योग मुद्रा करावे.

वरुण मुद्रा

पिंपल्स आणि मुरुमांसाठी ही सर्वोत्तम मुद्रा आहे. हे योगासन केल्याने त्वचा सॉफ्ट आणि स्मूद होते. हे करण्यासाठी सर्वप्रथम सुखासनाच्या मुद्रेत बसा. नंतर सर्वात लहान बोटाच्या साहाय्याने म्हणजेच करंगळीने अंगठ्याला हळुवारपणे स्पर्श करा. या आसनात पाच ते दहा मिनिटे बसल्याने शरीरात वॉटर बॅलेंस होते. ज्यामुळे तुमची त्वचा हायड्रेटेड राहते आणि त्वचेचा संसर्ग आणि कोरडेपणा दूर होतो.

पृथ्वी मुद्रा

योगाचार्यांनुसार मुरुम आणि पिंपल्स दुरुस्त करण्यासाठी आणि चमकदार त्वचा मिळविण्यासाठी शरीरातील पृथ्वी तत्त्वाचा समतोल राखणे अत्यंत आवश्यक आहे. पृथ्वी मुद्रा करण्यासाठी सुखासनाच्या मुद्रेत बसा. नंतर रिंग फिंगर म्हणजेच अनामिकाच्या साहाय्याने अंगठ्याला स्पर्श करा. इतर सर्व बोटे सरळ ठेवा. तसेच सामान्य पद्धतीने श्वास घ्या आणि श्वासाकडे लक्ष द्या. सुमारे १५ मिनिटे ही दोन्ही आसने केल्याने चेहऱ्यावरील चमक येण्यासोबतच पिंपल्स आणि मुरुम दूर होण्यास मदत होते.

करा हे योगासन

योग मुद्रा करण्यासोबतच या योगासनांचा आपल्या डेली रुटीनमध्ये समावेश करा. जेणेकरून पिंपल्स आणि मुरुमांपासून सुटका मिळू शकेल.

- शीतली प्राणायाम

- अनुलोम- विलोम प्राणायाम

- हलासन

- भुजंगासन

- मत्स्यासन

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner