Easy yoga exercises for knee pain: वाढत्या वयाबरोबर सांधे आणि गुडघेदुखी होऊ लागते. पण गुडघे आणि सांधेदुखीची समस्या पावसाळ्यात आणि हिवाळ्यात वाढते. याचे एक कारण म्हणजे शारीरिकदृष्ट्या सक्रिय नसणे. याशिवाय जास्त तेलकट पदार्थ खाल्ल्याने पावसाळ्यात गुडघेदुखीची तक्रार वाढते. वेदना कमी करण्यासाठी, स्नायूंना बळकट करणे आवश्यक आहे.
यासाठी योगाभ्यास प्रभावी ठरतो. योगा केल्याने पायांमध्ये रक्ताभिसरण सुधारते आणि गुडघेदुखीपासून आराम मिळतो. गुडघे मजबूत करण्यासाठी आणि पायांमधील असंतुलन कमी करण्यासाठी दररोज योगा करणे आवश्यक आहे. गुडघेदुखी आणि सांधेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी आम्ही तुम्हाला काही फायदेशीर योगासने सांगणार आहोत. या योगासनांच्या नियमित अभ्यासाने तुमचे पाय, घोटे, मांड्या आणि गुडघे मजबूत होण्यास मदत होईल.
या योगासनाच्या सरावाने स्नायू दुखणे कमी होते. त्रिकोनासन करण्यासाठी सर्वप्रथम सरळ उभे रहा. आता पायांमध्ये सुमारे दोन फूट अंतर ठेवा आणि दीर्घ श्वास घ्या. आणि शरीर उजवीकडे वाकवा. नंतर डावा हात वरच्या दिशेने घेऊन जा. तुमची नजर तुमच्या डाव्या हाताच्या बोटांवर ठेवा. काही वेळ या आसनात राहा आणि नंतर सामान्य स्थितीत या. आता दुसऱ्या बाजूने या प्रक्रियेचे अनुसरण करा.
या योगास पिरॅमिड पोज म्हणतात. पर्श्वोत्तनासनाचा सराव करण्यासाठी, उजवा पाय पुढे घ्या. आणि ४५ अंशाचा कोन करा. आता पुढे वाकून हात जमिनीवर ठेवा. गुडघे वाकवू नका. काही वेळ या अवस्थेत राहिल्यानंतर, सामान्य स्थितीत परत या. या योगासनांच्या नियमित सरावाने गुडघेदुखीपासून आराम मिळेल.
मलासनाचा सराव करण्यासाठी सरळ उभे राहून दोन्ही पायांमध्ये थोडे अंतर ठेवा. आता प्रार्थनेच्या मुद्रेत हात आणा आणि हळू हळू खाली बसा. श्वास सोडत पुढे थोडेसे वाका. मांड्यांमधून दोन्ही कोपर ९० अंशाच्या कोनात घ्या आणि सामान्यपणे श्वास घ्या. नंतर सामान्य स्थितीत सरळ उभे रहा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)