Yoga Mantra: आत्मविश्वास वाढवण्यासाठी दररोज करा ही ३ योगासनं, दिवसभर राहाल फ्रेश-yoga mantra do these 3 yoga poses daily to boost your self confidence ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Yoga Mantra: आत्मविश्वास वाढवण्यासाठी दररोज करा ही ३ योगासनं, दिवसभर राहाल फ्रेश

Yoga Mantra: आत्मविश्वास वाढवण्यासाठी दररोज करा ही ३ योगासनं, दिवसभर राहाल फ्रेश

Sep 02, 2024 09:04 AM IST

Confidence Boosting Yoga: योगासन फक्त आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले ठेवत नाही तर ते आपला आत्मविश्वास देखील वाढवतात. आत्मविश्वास वाढवण्यासाठी कोणती योगासनं रोज केली पाहिजेच हे जाणून घ्या.

Yoga Mantra- आत्मविश्वास वाढवणारी योगासन
Yoga Mantra- आत्मविश्वास वाढवणारी योगासन (unsplash)

Yoga Poses to Boost Self Confidence: वैयक्तिक आयुष्य असो किंवा प्रोफेशनल, आत्मविश्वासाचा अभाव माणसाला सगळीकडे मागे आणतो. त्यामुळेच आजच्या काळात प्रत्येक व्यक्ती आपला आत्मविश्वास दृढ ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. असे असूनही अनेकांना स्वत:मध्ये आत्मविश्वासाचा अभाव जाणवतो. ज्यामुळे चिंता, नैराश्य आणि नकारात्मक विचार त्यांच्या मनाला सतत घेरत असतात. जर तुम्हालाही तुमचा गमावलेला आत्मविश्वास परत मिळवायचा असेल तर या ३ योगासनांचा आपल्या रुटीनमध्ये ताबडतोब समावेश करा. ही योगासनं तुमचा आत्मविश्वास वाढवण्यास मदत करतील.

आत्मविश्वास वाढवण्यास मदत करणारी योगासनं

वृक्षासन

वृक्षासनामुळे विचारात स्पष्टता येते आणि माणूस अधिक चांगले निर्णय घेऊ शकतो. एकाग्रता आणि लक्ष वाढविण्यासाठी वृक्षासन केले जाते. वृक्षासन केल्याने पोश्चर देखील सुधारते आणि आत्मविश्वासही वाढतो. या आसनाचा नियमित सराव केल्याने पायाचे नितंब, मांड्या आणि गुडघे मजबूत होतात. ज्याचा फायदा तासनतास एकाच ठिकाणी बसणाऱ्यांना होतो.

सूर्यनमस्कार

सूर्यनमस्कार हे एक उत्तम योगासन आहे जे आपले संपूर्ण शरीर सक्रिय ठेवण्यास मदत करते. या योगासनाचा नियमित सराव केल्याने शरीर लवचिक होऊन रक्ताभिसरण सुधारते आणि मन शांत होते. सूर्यनमस्काराचा रोज सराव केल्याने व्यक्तीला आत्मविश्वास वाढून ऊर्जावान वाटू लागते. ज्यामुळे त्याचा संपूर्ण दिवस फ्रेश राहतो.

ताडासन

ताडासन केल्यामुळे शरीर बळकट होते आणि मन शांत होते. हे आसन आपला आत्मविश्वास वाढविण्यास मदत करते. कारण हे आपल्याला स्वत: वर नियंत्रण ठेवण्यास शिकवते. उभे राहून केलेल्या ताडासनामुळे उंची वाढण्यास मदत होते आणि या योगासनाचा डेली रुटीनमध्ये समावेश केल्याने आत्मविश्वास वाढण्यास आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहण्यास मदत होते, असे योगतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग