Avoid These Mistakes While Doing Pranayama: फिट राहण्यासाठी बहुतांश लोक नियमित योगासन करतात. योगासन, प्राणायाम याचे आरोग्यासाठी असणारे फायदे सर्वांनाच माहीत आहे. नियमित प्राणायाम केल्याने अनेक आजार टाळता येतात. उच्च रक्तदाब, स्ट्रेबस, हृदयविकार, पोट आणि श्वासोच्छवासाशी संबंधित समस्यांमध्ये प्राणायाम खूप फायदेशीर आहे. मात्र प्राणायाम करण्याचे काही नियम आहेत. त्याचे पालन न केल्यास प्राणायामाचे पूर्ण फायदे शरीराला मिळत नाहीत. शिवाय आरोग्यावर देखील त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. तुम्हाला हे टाळायचे असेल तर काही चुका टाळल्या पाहिजे. प्राणायाम करताना कोणत्या चुका करू नये हे जाणून घ्या.
बहुतेक वेळा प्राणायाम करताना डोळे बंद करण्याचा सल्ला दिला जातो. आजूबाजूला पाहण्यासाठी किंवा मोबाईल पाहण्यासाठी तुम्ही वारंवार डोळे उघडले, तर प्राणायामापासून फोकस दुसरीकडे जाऊ लागते. त्यामुळे प्राणायाम करण्याचा फ्लो खंडित होतो.
एखाद्या आसनात बसून प्राणायाम केला जातो. पण जर तुम्ही वारंवार तुमचे आसन किंवा बसण्याची पद्धत बदलली तर ध्यानात अडथळा येतो. त्यामुळे प्राणायामाचा पूर्ण लाभ मिळत नाही.
प्राणायाम हा श्वासोच्छवासाचा व्यायाम प्रकार आहे. हे करत असताना पूर्ण लक्ष श्वासावर असणे महत्त्वाचे आहे. पण अनेक वेळा लोकांचे लक्ष श्वासावरून विचलित होते. त्यामुळे श्वासोच्छवासाचा क्रम बिघडतो आणि प्राणायामाचा पूर्ण फायदा मिळत नाही.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)