मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Yoga Mantra: सकाळ आरोग्यदायी करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे योग! असे होतात फायदे

Yoga Mantra: सकाळ आरोग्यदायी करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे योग! असे होतात फायदे

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jan 28, 2023 10:50 AM IST

Yoga Benefits: जेव्हा तुम्ही सकाळच्या पहिल्या दोन तासांत योगाभ्यास करता तेव्हा त्याचा फक्त तुमच्या शारीरिक आरोग्याला फायदाच होत नाही तर तुमचे फोकस देखील वाढते.

सकाळी योगा करण्याचे फायदे
सकाळी योगा करण्याचे फायदे

Reasons of Doing Yoga In The Morning: योग तुमच्या शरीरासाठी, आत्मा आणि मनासाठी खूप फायदेशीर आहे. तो आजपासून नाही तर हजारो वर्षांपासून भारतीय संस्कृतीचा भाग आहे. नियमितपणे योगाभ्यास केल्याने तुमचे शरीर रोगांपासून दूर राहून निरोगी राहतेच, पण ते तुमचे मन आणि आत्मा देखील शुद्ध करते. सकाळी योगासने करणे विशेषतः फायदेशीर ठरू शकते. तुमच्या दिवसाची सुरुवात योगाने करा आणि ते तुमच्या आयुष्यात काय फरक आणू शकते ते पहा.

दररोज सकाळी योगासने करण्याचे फायदे

१. आपल्या पहिल्या श्वासाचे पुनर्वापर करते

इंटरनॅशनल जर्नल ऑफ ओबेसिटीच्या संशोधनानुसार दिवसाचा पहिला श्वास हा दिवसाची निर्मिती, जगण्याची आणि आनंद घेण्यासाठी सर्वात शक्तिशाली, लपलेली क्षमता आहे. “माझा दिवस व्यस्त आहे” किंवा “आज माझी तब्येत ठीक नाही” असा विचार करून तुम्ही उठत असाल, तर डोळे बंद करा, मागे फिरा, दीर्घ श्वास घ्या आणि पुन्हा उठा. आपण जेवढे तास उठतो त्यावरून आपला दिवस कसा असेल हे ठरते. तुमच्या दिवसाचा पहिला तास स्वतःला सक्रिय करण्यासाठी वापरा, जेणेकरून तुमच्या दिवसातील उरलेले तास अर्थपूर्णपणे वापरता येतील.

२. योगाभ्यास केल्याने शरीर किक स्टार्ट होते

जेव्हा आपण जागे होतो तेव्हा आपले शरीर थंड आणि अधिक आरामशीर अवस्थेत असते. जेव्हा आपण योगाभ्यास करतो तेव्हा शरीर गरम होते आणि ही ऊर्जा शक्ती केंद्रात बदलते. मन आंतरिक जाणिवेची सुरुवात करण्यासाठी आणि मानसिक चिकाटीची शक्ती सोडण्यासाठी सक्रिय होते.

३. हृदयविकाराचा प्रतिबंध

तुम्हा सर्वांना हे माहित असेलच की हृदय हे सर्वात नाजूक ठिकाण तसेच सर्वात महत्वाचे ठिकाण आहे आणि असंतुलित दिनचर्या किंवा चुकीच्या आहारामुळे अनेक प्रकारचे हृदयरोग आणि हृदयाशी संबंधित अनेक प्रकारच्या समस्यांचा धोका असतो. अशा स्थितीत सकाळी योगाभ्यास केल्याने तुम्ही अनेक प्रकारच्या प्राणघातक आजारांपासून स्वतःचा बचाव करू शकता आणि अनेक प्रकारच्या आजारांपासून मुक्ती मिळवू शकता.

४. मेंदू सक्रिय राहतो

एनसीबीआय (नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन) या वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार सकाळी उठल्यावर आपले शरीर आणि मेंदू सक्रिय नसतो आणि जेव्हा आपण सकाळी नियमितपणे योगाभ्यास करतो तेव्हा आपला मेंदू अधिक सक्रिय राहतो. राग शांत राहते. आपण आपले काम अधिक सर्जनशील पद्धतीने करतो.

५. रोगप्रतिकार शक्ती वाढते

आपल्या आरोग्यासाठी रोगप्रतिकार शक्ती खूप महत्वाची आहे, ती आपल्या शरीरातील रोगांशी लढण्यास मदत करते आणि आपल्याला विविध रोगांपासून सुरक्षित ठेवते. हे आजारी आणि निरोगी लोकांसाठी खूप फायदेशीर आहे. म्हणून तुम्ही तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी योगासने सुरू करू शकता. तुम्हाला खूप कमी वेळात खूप चांगले परिणाम मिळू लागतात.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग