मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Yoga Mantra: रक्ताभिसरण सुधारून चेहऱ्याची चमक वाढवतात ही योगासने, जाणून घ्या कशी करायची?

Yoga Mantra: रक्ताभिसरण सुधारून चेहऱ्याची चमक वाढवतात ही योगासने, जाणून घ्या कशी करायची?

Aarti Vilas Borade HT Marathi
Jun 25, 2024 03:17 PM IST

Yoga Mantra: काही योगासनांचा नियमित सराव केल्याने रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे चेहऱ्याची चमक वाढते. अशाच काही योगासनांबद्दल जाणून घेऊया.

shweta tiwari young and glowing skin care secret
shweta tiwari young and glowing skin care secret

glowing skin Yoga: वयानुसार कोणत्याही व्यक्तीच्या शरीरात आणि त्वचेत बदल होणे स्वाभाविक आहे. परंतु त्वचेवर होणारे काही अकाली बदल जसे की सुरकुत्या, बारीक रेषा आणि काळे डाग हे वाढत्या वयाचा परिणाम नसून जीवनशैलीतील बदलांचा परिणाम देखील असू शकतो. आज काल बदलेली जीवनशैली आणि तणावामुळे अकाली वृद्धत्वाची समस्या लोकांना जाणवू लागली आहे. पण अशी काही योगासने आहेत जी केल्यामुळे या सगळ्या गोष्टी टाळता येतात. आता ही योगासने कोणती असा प्रश्न तुम्हाला पडला असेल चला जाणून घेऊया...

त्रिकोणासन:

त्रिकोणासन केल्याने छाती व फुफ्फुसे थोडी फुगतात. त्यामुळे त्यांच्यात अधिक प्राणवायूचा संचार होतो. या ऑक्सिजनमुळे त्वचेची चमक वाढण्यास मदत होते. त्रिकोणासन करण्यासाठी सर्वप्रथम जमिनीवर योगा मॅट ठेवून सूर्यनमस्काराच्या मुद्रेच उभे राहा. यानंतर आपल्या पायात एक फूटाचे अंतर ठेवा आणि उजव्या हाताने उजव्या पायाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करताना डावा हात हवेत हलवत ठेवा. हे करताना आपले शरीर ९० अंशाच्या कोनात असावे हे लक्षात ठेवा. काही वेळ या आसनात राहिल्यानंतर पुन्हा पहिल्या पोझवर या. या योगासनाची दोन्ही बाजूंनी पुनरावृत्ती करा. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा.
वाचा: घरच्याघरी बनवा हा अनोखा टरबूज पिझ्झा! खायला हेल्दी आणि बनवायला अगदी सोपा

हलासन

हलासनामुळे पचनाचा वेग वाढण्यास मदत होते. याच्या नियमित सरावामुळे रक्ताभिसरणही सुधारते. ज्यामुळे त्वचा चमकदार होते. हलासन करण्यासाठी सर्वप्रथम जमिनीवर झोपा आणि आपले पाय डोक्याच्या दिशेने ठेवा. हे करताना पाय डोक्यावरून जमिनीला जास्तीत जास्त स्पर्श करतील याची काळजी घ्या. चमकदार त्वचेसाठी दिवसातून तीन वेळा हे आसन करा.
वाचा: पुढच्या महिन्यात लग्न आहे आणि चेहरा टॅन झाला? फॉलो करा या पाच टीप्स चेहऱ्यावर येईल ग्लो

ट्रेंडिंग न्यूज

सर्वंगासन

सर्वंगासन करताना खांद्यावर आणि डोक्यावर शरीराचा समतोल राखला जातो. ज्यामुळे रक्ताभिसरण डोके आणि चेहऱ्याच्या दिशेने होऊ लागते. हे आसन चेहऱ्यावर चमक आणते. सर्वंगासन करण्यासाठी प्रथम पाठीवर झोपा. यानंतर पाय, नितंब आणि नंतर कंबर वर करा. असे केल्याने तुमचे सर्व वजन तुमच्या खांद्यावर पडेल. आपल्या हातांनी पाठीला आधार देताना कोपर जवळ आणा. खांद्याला आधार देत हात पाठीवर ठेवा. आपली कंबर आणि पाय सरळ ठेवा, कोपर जमिनीवर दाबून ठेवा आणि हात कमरेवर ठेवा. हे करताना लक्षात ठेवा की आपल्या शरीराचे संपूर्ण वजन आपल्या खांद्याच्या आणि हातांच्या वरच्या भागावर असावे. मानेत ताण जाणवत असेल तर आसनातून बाहेर पडा. या आसनात राहून ३०-६० सेकंद दीर्घ दीर्घ श्वास घेत राहा. हे आसन नेहमी केल्याने देखील चेहऱ्यावर चमक येते.
वाचा: वेडिंग रिसेप्शनमध्ये सोनाक्षी सिन्हाचा जलवा, लुकमध्ये आहेत या खास गोष्टी

WhatsApp channel