मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Year Ender 2023: वजन कमी करण्यासाठी चर्चेत होत्या या टिप्स आणि ट्रिक्स, तुम्ही किती ट्राय केल्या?

Year Ender 2023: वजन कमी करण्यासाठी चर्चेत होत्या या टिप्स आणि ट्रिक्स, तुम्ही किती ट्राय केल्या?

Dec 17, 2023 08:43 PM IST

Weight Loss Tips and Tricks of 2023: अनेक लोक नवीन वर्षाच्या सुरुवातीला वजन कमी करण्याचा संकल्प करतात. अशा परिस्थितीत वजन कमी करण्यासाठी काही उत्तम टिप्स आणि ट्रिक्स २०२३ मध्ये ट्रेंडमध्ये होते.

वेट लॉस टिप्स आणि ट्रिक्स
वेट लॉस टिप्स आणि ट्रिक्स

Trending Weight Loss Tips and Tricks in Year 2023: नवीन वर्षाच्या सुरुवातीला लोक अनेक संकल्प करतात. त्यात वजन कमी करण्याचे, मानसिक आरोग्य तसेच शारीरिक आरोग्याशी संबंधित संकल्प प्राधान्याने केले जातात. २०२३ च्या सुरुवातीला लोकांनी स्वतःला फिट ठेवण्यासाठी आणि वजन कमी करण्याचे संकल्प केले. ज्या लोकांना खरोखर वजन कमी करायचे आहे ते नवीन वर्षाच्या वेट लॉस ट्रेंड फॉलो करण्यास सुरवात करतात. जर तुम्ही वेट लॉस डायट आणि तुमच्यासाठी योग्य असलेल्या वर्कआउट प्लॅनसह काही टिप्स आणि ट्रिक्स फॉलो केल्या तर वजन कमी करण्याचे ध्येय गाठता येईल. येथे जाणून घ्या या संपूर्ण वर्षात कोणत्या वेट लॉस टिप्स आणि ट्रिक्स चर्चेत होत्या.

ट्रेंडिंग न्यूज

२०२३ च्या टॉप ५ वेट लॉस टिप्स आणि ट्रिक्स

संध्याकाळी ७ पर्यंत जेवण करा

या वर्षी वजन कमी करण्यासाठी अनेक टिप्स आणि ट्रिक्स चर्चेत होत्या. त्यापैकी एक ही होती. रात्रीचे जेवण सायंकाळी ७ वाजेपर्यंत करावे, असे तज्ञ सांगतात. सेलेब्रिटी देखील संध्याकाळी ६ ते ७ दरम्यान रात्रीचे जेवण करतात. जर तुम्हाला १० वाजेपर्यंत झोपायचे असेल तर रात्रीचे जेवण लवकर करणे चांगले असते.

वेट लॉससाठी इंटरमिटेंट फास्टिंग

वजन कमी करण्यासाठी इंटरमिटेंट फास्टिंग हे बरेच चर्चेत होते. या उपवासात लोक दिवसभर ठराविक वेळेत जेवण करतात किंवा खातात आणि उर्वरित वेळेत उपवास करतात. यामध्ये १६/८ तासांनुसार डाएट प्लॅन ठरवला जातो. ज्यामध्ये तुम्हाला ८ तास जेवायचे आहे आणि उर्वरित १६ तास उपवास करायचा आहे. याचे योग्य प्रकारे पालन केल्याने वजन कमी होऊ शकते.

योग्य पद्धतीने चावून खाणे

वजन कमी करण्यासाठी योग्य खाण्यासोबतच योग्य पद्धतीने खाणे सुद्धा महत्त्वाचे आहे. अन्न नीट चावून खाल्ल्याने पचनक्रिया व्यवस्थित राहते आणि वजन कमी होण्यासही मदत होते. तुमच्या अन्नाची चव आणि फायद्यांचा आनंद घेण्यासाठी किमान ३० मिनिटे घ्या. अन्न हळूहळू चावून खाल्ल्याने सहज पचते आणि वजन कमी होण्यास मदत होते.

३० मिनिटचे वॉक

वजन कमी करण्याच्या या ट्रिकची या वर्षी बरीच चर्चा झाली. खरं तर वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कॅलरीज नियंत्रित करणे आणि कॅलरीज बर्न करणे हे आहे. अशा परिस्थितीत दररोज ३० मिनिटे चालण्याचा सल्ला दिला जातो. हे नियमित केल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

 

पुरेशा प्रमाणात पाणी प्या आणि झोपा

दररोज योग्य प्रमाणात झोप घेतल्यास आणि योग्य प्रमाणात पाणी प्यायल्यास वजन कमी होण्यास मदत होते. दररोज किमान ७ ते ८ ग्लास पाणी प्या आणि किमान ८ तास झोपा. झोप पूर्ण करण्याची सर्वात चांगली वेळ ही रात्री १० ते ११ पर्यंत झोपणे ही आहे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel