Year Ender 2023: या ट्रॅव्हल ट्रेंड्सनी गाजवले वर्चस्व, लोकांनी असा केला प्रवास
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Year Ender 2023: या ट्रॅव्हल ट्रेंड्सनी गाजवले वर्चस्व, लोकांनी असा केला प्रवास

Year Ender 2023: या ट्रॅव्हल ट्रेंड्सनी गाजवले वर्चस्व, लोकांनी असा केला प्रवास

Published Dec 18, 2023 09:33 PM IST

Travel Trends of 2023: सरत्या वर्षाला निरोप देताना आणि येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत करत असताना 2023 मध्ये कोणत्या ट्रॅव्हल ट्रेंडने राज्य केले ते जाणून घ्या.

२०२३ मधील ट्रॅव्हल ट्रेंड
२०२३ मधील ट्रॅव्हल ट्रेंड (unsplash)

How People Travelled in 2023: यंदाचे हे वर्ष रंजक घडामोडींनी भरलेले होते. २०२३ ला निरोप देण्यासाठी आणि २०२४ चे स्वागत करण्यासाठी आपण सज्ज झालो आहोत. हे वर्ष गाजवलेले काही ट्रॅव्हल ट्रेंड्स परत पाहू या. हे ट्रेंड दर्शवतात की आपण प्रवास करण्याचा मार्ग नेहमीच कसा बदलत असतो. आपण अधिक इको-फ्रेंडली ट्रॅव्हल पर्याय आणि परवडणाऱ्या ट्रिपवर लक्ष केंद्रित करणे यासारख्या गोष्टी पाहिल्या. २०२३ मध्ये वर्चस्व गाजवणारे काही ट्रॅव्हल ट्रेंड पहा.

क्लायमेट कॉन्शियस ट्रॅव्हल

प्रवास करणारे लोक पर्यावरणावर कसा परिणाम होतो याचा अधिक विचार करू लागले. त्यांनी अशा गोष्टी करण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे प्रदूषण कमी होईल, जसे की ते भेट देणारी ठिकाणे स्वच्छ ठेवणे आणि स्थानिक संस्कृतीचा आदर करणे. तसेच त्यांनी राहण्यासाठी अशी ठिकाणे निवडली जी पर्यावरणासाठी चांगली आहेत. स्थानिक समुदायांना मदत केली आणि नैतिक अनुभव निवडले.

उदयोन्मुख डेस्टिनेशन्स

ऑफबीट डेस्टिनेशन्स एक्सप्लोर करणे हा एक प्रवासाचा ट्रेंड आहे ज्याने पर्यटकांना अनेक वर्षांपासून मोहित केले आहे आणि ते २०२३ मध्येही होते. यामुळे व्हिएतनाम, सेशेल्स, अझरबैजान, कझाकस्तान, मालदीव, लाओस, बेलारूस, कोलंबिया, बल्गेरिया आणि झांझिबार सारखी काही नवीन आणि रोमांचक प्रवासाची ठिकाणे लोकप्रिय झाली. लोकांना विशेष अॅडव्हेंचर, यूनिक अनुभव हवे होते आणि हे उदयोन्मुख डेस्टिनेशन्स तेच ऑफर करतात.

वेलनेस ट्रॅव्हल

अनेक वर्षांपासून वेलनेस ट्रॅव्हलची लोकप्रियता वाढत गेली, जी २०२३ मध्ये सुद्धा कायम होती. प्रवाश्यांनी अशा ट्रिप निवडल्या ज्यामुळे त्यांना शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारे बरे वाटले. ते योगा रीट्रीट, स्पा ट्रीटमेंट आणि हेल्दी फूड पर्याय असलेल्या ठिकाणी गेले.

बजेट फ्रेंडली ट्रॅव्हल

लक्झरी ट्रिपऐवजी प्रवासी अधिक परवडणाऱ्या पर्यायांसाठी गेले. नवीन लोकांना भेटण्यासाठी आणि मित्र बनवण्यासाठी त्यांनी बजेट-फ्रेंडली हॉस्टेल बुक केली किंवा ग्रुप ट्रिपसाठी मोठे Airbnb रेन्टल निवडले. २०२३ मध्ये लोकांना स्थानिक विक्रेत्यांकडून वस्तू खरेदी करणे, स्वतःचे जेवण बनवणे आणि जास्त पर्यटन नसलेली ठिकाणे एक्सप्लोर करणे देखील आवडले.

 

डिजिटल रोव्हर

२०२३ मध्ये अनेक कार्यालयांनी त्यांच्या कर्मचार्‍यांना घरून काम करू दिले. याचा अर्थ असा होतो की ज्यांच्याकडे नियमित नोकऱ्या आहेत असे अनेक लोक डिजिटल भटके किंवा रोव्हर होऊ शकले. ते जगभर प्रवास करू शकतात किंवा त्यांचे नियमित कामाचे तास करत असताना स्थानिक राहू शकतात. २०२४ मध्ये हा ट्रेंड चालू राहण्याची शक्यता आहे. कारण अधिकाधिक लोक रिमोट कामाचा किंवा वर्क फ्रॉम होमचा मार्ग निवडत आहेत.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner