मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Year Ender 2023: हे आहेत या वर्षातील सर्वात जास्त आवडलेले किचन हॅक्स, तुम्ही ट्राय करून पाहिलेत का?

Year Ender 2023: हे आहेत या वर्षातील सर्वात जास्त आवडलेले किचन हॅक्स, तुम्ही ट्राय करून पाहिलेत का?

Dec 16, 2023 10:28 PM IST

Best Kitchen Hacks of 2023: किचनमधील काम सोपे करण्यासाठी विविध हॅक्स, ट्रिक्स वापरल्या जातात. २०२३ मध्ये लोकांना कोणते किचन हॅक सर्वात जास्त आवडले हे तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या.

किचन हॅक्स
किचन हॅक्स (unsplash)

Best Kitchen Hacks in Year 2023: महिलांचे स्वयंपाकघरातील काम सोपे व्हावे, वेळेची बचत व्हावी यासाठी विविध किचन हॅक्स, ट्रिक्स महिला वापरत असतात. वर्क लाइफ आणि होम लाइफ बॅलेन्स करण्यासाठी हे हॅक्स खूप उपयोगी ठरतात. या स्मार्ट किचन टिप्स केवळ त्यांचा वेळ वाचवत नाहीत तर जेवणाची चव आणि आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करतात. आता २०२३ हे वर्ष काही दिवसातच आपल्या सर्वांना निरोप देणार आहे. तेव्हा या सरत्या वर्षात महिलांना कोणत्या किचन टिप्स सर्वाधिक आवडल्या हे जाणून घेऊया. या किचन हॅकवर एक नजर टाकूया, जे तुमचे किचन लाइफ सोपे करू शकता.

ट्रेंडिंग न्यूज

सॅलड आणि भाजीची शिमला मिरची मधील फरक जाणून घेण्यासाठी टिप्स

पिवळ्या आणि लाल शिमला मिरचीपेक्षा हिरवी शिमला मिरची आपल्या घरात जास्त खाल्ली जाते. पिझ्झा आणि पास्ता यांसारख्या गोष्टींसाठी पिवळी शिमला मिरचीचा वापर केला जातो. तर लाल सिमला मिरचीची चव गोड असते, म्हणून ती सॅलड आणि गार्निशिंगसाठी वापरली जाते. जर हिरव्या शिमला मिरचीबद्दल बोलायचे झाले तर हिरव्या शिमला मिरचीच्या लोब्सची संख्या त्याच्या चव आणि तिखटपणाचे रहस्य प्रकट करते. ३ लोब असलेली शिमला मिरची तिखट असतात आणि ते शिजवण्यासाठी वापरले जातात. तर ४ लोब असलेले शिमला मिरची चवीला गोड असते आणि ते सॅलडसाठी चांगले मानले जाते.

चाकूला धार करण्यासाठी टिप्स

स्वयंपाकघरात चाकूचा सतत वापर केल्यामुळे त्याची धार कमी होऊ लागते. चाकूची धार कमी झाल्यामुळे भाज्या आणि फळे कापण्यासाठी जास्त वेळ लागतो. अशा स्थितीत चाकूला धार लावण्यासाठी चीनीचे बाउल घ्या आणि ती उलटी करून खालच्या बाजूने चाकूला धार लावा. धार तीक्ष्ण झाल्यावर गरम पाण्यात टाकून स्वच्छ करा. अशा प्रकारे तुम्ही फक्त १० मिनिटांत चाकू धारदार करू शकता.

लसूण सोलण्यासाठी टिप्स

लसणाच्या पाकळ्या सोलण्यासाठी झाकण असलेले जार किंवा दोन लहान वाट्या एकत्र घ्या. लसूण पाकळ्या घालून जोरात हलवा. तुम्हाला दिसेल की ही सालं लसणातून आपोआप निघाली असतील.

लिंबाचा रस काढण्यासाठी टिप्स

बर्‍याच वेळा लिंबू फ्रीजमधून बाहेर काढल्यानंतर लगेच त्यातून रस काढणे खूप कठीण वाटते. अशा स्थितीत फ्रीजमधून लिंबू काढल्यानंतर १०-२० सेकंद मायक्रोवेव्ह करा. असे केल्याने तुम्हाला लिंबाचा रस काढण्यासाठी जास्त मेहनत करावी लागणार नाही.

बटाटे उकळताना कुकर काळा होणार नाही

बटाटे उकळताना त्यात मीठ आणि लिंबाचा तुकडा टाकून शिट्ट्या घ्या. हा उपाय करून पाहिल्यास बटाट्याची साल लवकर निघते आणि कुकर आतून काळा होणार नाही. कुकर जरी काळा झाला तरी तो लिंबाच्या सालाने साफ करता येतो.

कट केलेले सफरचंद होणार नाही काळे

थंड पाण्यात मीठ आणि लिंबू घालून तुम्ही त्यात सफरचंद भिजवा आणि फ्रिजमध्ये ठेवा. असे केल्याने सफरचंद बराच काळ ताजे राहते आणि काळे होणार नाही.

कांद्याची पेस्ट तयार करण्यासाठी टिप्स

कढईत तेल घाला आणि चिरलेला कांदा घालून २-३ मिनिटे परतून घ्या. नंतर बरणीत ठेवा. आता या कांद्यासोबत लसणाच्या पाकळ्या भाजून घ्या आणि साठवा. या गोष्टी ७-१० दिवस आरामात टिकतील. तुम्हाला ते बारीक करायचे असो किंवा भाजीमध्ये असेच घालायचे असो, तुम्ही वेळ न घालवता आरामात वापरू शकता.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel
विभाग