मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Ayurveda Tips: आयुर्वेदानुसार दुधासोबत चुकूनही करू नका या गोष्टींचे सेवन, होतात दुष्परिणाम

Ayurveda Tips: आयुर्वेदानुसार दुधासोबत चुकूनही करू नका या गोष्टींचे सेवन, होतात दुष्परिणाम

Jan 09, 2024 02:31 PM IST

Food Combination: दुध हे आरोग्यासाठी फायदेशीर म्हटले जाते. तरी आयुर्वेदानुसार काही गोष्टींचे सेवन दुधासोबत केल्याने फायद्याऐवजी नुकसान होते. कोणते पदार्थ दुधासोबत खाऊ नये ते जाणून घ्या.

दुधासोबत कोणत्या गोष्टी खाऊ नये
दुधासोबत कोणत्या गोष्टी खाऊ नये (unsplash)

Wrong Food Combinations With Milk: लहान मुले असो किंवा मोठे प्रत्येकाला निरोगी आरोग्यासाठी दररोज दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, झिंक, व्हिटॅमिन बी १२, व्हिटॅमिन डी आणि प्रथिने मुबलक प्रमाणात दुधामध्ये आढळतात. त्याचे आरोग्य फायद्यांचा विचार करून त्याला संपूर्ण अन्न म्हटले जाते. सीडीसीनुसार मुलांना आवश्यक असलेले कॅल्शियम मिळविण्यासाठी त्यांनी दिवसातून २ ते ३ कप दूध प्यावे. तर मोठ्या लोक रोज २ ग्लास दूध पिऊ शकता. दुधाचे सेवन केल्याने शरीरात कॅल्शियमची कमतरता भासत नाही आणि हाडे फ्रॅक्चर होण्याचा धोकाही कमी होतो. आरोग्यासाठी इतके फायदेशीर असूनही आयुर्वेदानुसार काही गोष्टींसोबत दुधाचे सेवन केल्याने आरोग्याला फायदा होत नाही तर हानी होते. जाणून घ्या कोणत्या गोष्टींचे सेवन दुधासोबत कधीच करू नये.

दूध आणि मासे

दुधासोबत मासे खाल्ल्याने अनेकांना पचनाच्या समस्या आणि एलर्जी होऊ शकते. ज्यामुळे खाज सुटणे आणि जळजळ होऊ लागते. या मिश्रणामुळे त्वचेशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. अशा परिस्थितीत ही समस्या टाळण्यासाठी आयुर्वेदात दुधासोबत मासे न खाण्याचा सल्ला दिला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

दुधासह लिंबूवर्गीय फळे

संत्री, लिंबू आणि द्राक्षे यांसारखी आंबट फळे दुधासोबत खाल्ल्याने पचनास त्रास होऊ शकतो. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला उलट्या, पोटदुखी आणि जुलाब यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. वास्तविक दूध पचायला जास्त वेळ लागतो आणि जेव्हा तुम्ही दुधासोबत लिंबूवर्गीय फळे खाणे निवडता तेव्हा तुम्हाला गॅस आणि छातीत जळजळ होण्याची समस्या असू शकते. याशिवाय सर्दी, खोकला, पुरळ आणि एलर्जी देखील होऊ शकते. म्हणूनच आयुर्वेदात दूध पिण्याच्या काही तास आधी किंवा नंतर फळे खाण्याचा सल्ला दिला आहे.

दुधासह मीठयुक्त स्नॅक्स

जर तुम्हाला स्किन एलर्जी किंवा त्वचेशी संबंधित समस्या असतील तर दुधासोबत मीठयुक्त स्नॅक्सचे सेवन केल्याने तुमच्या समस्या वाढू शकतात. चिप्स आणि सॉल्टेड स्नॅक्ससोबत दुधाचे सेवन करू नये. या गोष्टींमध्ये मीठ मोठ्या प्रमाणात आढळते. ज्यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलन बिघडू शकते.

दूध आणि मांस

दुधासोबत मांस खाल्ल्याने शरीरात विषारी पदार्थ तयार होतात. या दोन्हीचे गुणधर्म एकमेकांपेक्षा वेगळे आहेत. त्यामुळे या दोन्ही गोष्टी एकत्र सेवन केल्याने अपचन किंवा पोटदुखीसारख्या समस्या उद्भवू शकतात.

 

दूध आणि केळी

अनेक वेळा बारीक लोक वजन वाढवण्यासाठी दुधासोबत केळीचे सेवन करतात. दुधासोबत केळी खाणे हे खूप जुने फूड कॉम्बिनेशन आहे, बरेच लोक आवडीने खातात. पण काही लोक या फूड कॉम्बिनेशनमुळे पचन बिघडल्याची तक्रार करतात. तर काही लोकांना सर्दी, खोकला, त्वचेवर पुरळ किंवा पोटात गॅस होण्यासारख्या समस्यांचा त्रास होतो.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel