११७ वर्षे जगलेल्या आज्जीने सांगितल्या दीर्घायुष्यासाठीच्या साध्या सोप्या १० टिप्स
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  ११७ वर्षे जगलेल्या आज्जीने सांगितल्या दीर्घायुष्यासाठीच्या साध्या सोप्या १० टिप्स

११७ वर्षे जगलेल्या आज्जीने सांगितल्या दीर्घायुष्यासाठीच्या साध्या सोप्या १० टिप्स

Aug 26, 2024 04:35 PM IST

secret to a long life - ११७ वर्ष जगलेल्या स्पेनच्या मारिया ब्रन्यास या आजीने दीर्घायुष्याबाबत दहा गोष्टी सांगून ठेवल्या आहेत. या दहा गोष्टींवर अवलंब केला तर जगणं सोपं आणि दीर्घायुषी होतं असं या आजीचं म्हणण होतं.

११७ वर्ष जगलेल्या आज्जीने सांगितल्या दीर्घायुष्यासाठीच्या साध्या सोप्या १० टीप्स!
११७ वर्ष जगलेल्या आज्जीने सांगितल्या दीर्घायुष्यासाठीच्या साध्या सोप्या १० टीप्स!

सध्याच्या धकाधकीच्या काळात प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या तणावाखाली जगत असतो. याचा सर्वाधिक तोटा शरीराला होवून परिणामी अनेक आजार बळावतात. शिवाय कौटुंबीक नाते-संबंधातला कलह, सततची चिंता, नकारात्मक लोकांसोबतचा वावर या गोष्टींमुळेही तुमच्या आरोग्यावर अदृष्यपणे चुकीचा परिणाम होत असतो. स्पेनमध्ये राहणाऱ्या मारिया ब्रन्यास या नर्स आजीचं गेल्या आठवड्यात निधन झालं. त्या ११७ वर्षाच्या होत्या. या आजीच्या दीर्घायुष्याबाबत जगभरात कुतूहल निर्माण झालं आहे. परंतु आयुष्य कसं जगावं याबाबत या आजीने दहा गोष्टी सांगून ठेवल्या होत्या. या दहा गोष्टींवर अवलंब केला तर जगणं सोपं आणि दीर्घायुषी होतं असं मारिया ब्रन्यास आजीचं म्हणण होतं.

मारिया ब्रन्यास यांचा जन्म ४ मार्च १९०७ रोजी अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे झाला होता. मारिया यांनी सुरूवातीला स्पेनमध्ये नर्स म्हणून काम केले होते. त्यानंतर कपडे शिवण्याचे काम हातात घेतले. त्यांना तीन मुले आहेत. १९७६ साली त्यांच्या पतीचे निधन झाल्यानंतर आयुष्यात निर्माण झालेला एकटेपण घालवण्यासाठी त्यांनी संगीत शिक्षणाची वाट धरली. दरम्यानच्या काळात मारिया या जागतिक इतिहासातील अनेक महत्त्वाच्या घटनांच्या साक्षीदार ठरल्या. 

वयाच्या आठव्या वर्षी त्यांना एका कानाने कमी ऐकू येत असल्याची समस्या निर्माण झाली होती. त्यानंतर स्पॅनिश फ्लू आणि कोरोनासारख्या साथीच्या आजारातून त्या बचावल्या होत्या. १९२० साली म्हणजे त्यांच्या वयाच्या ११३ व्या वर्षी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर औषधोपचारानंतर एका आठवड्यात त्या कोरोनातून बऱ्या झाल्या होत्या. त्यांच्या ८६ वर्षाचा मुलाचा मृत्यू झाला होता. ११७ वर्ष जगलेल्या मारिया ब्रन्यास यांच्या उत्तम तब्येतीमागे त्यांच्या आयुष्यात लाभलेली भावनिक स्थिरता आणि कमी ताणतणाव ही प्रमुख कारणं असल्याचं त्या बोलतात.

दीर्घायुष्यासाठीच्या आजीने सांगितलेल्या दहा टीप्स!

१) आयुष्यात शिस्त बाळगा 

२) मनावर ताण घेऊ नका

३) कुटुंबासोबत चांगले संबंध ठेवा

४) मित्रांसोबत कनेक्शन ठेवा

५) निसर्गाचा आनंद घ्या

६) जीवनात भावनिक स्थैर्य ठेवा

७) भविष्याची सतत चिंता करू नका  

८) मनात पश्चातापाची भावना ठेवू नका

९) सकारात्मक विचार करा

१०) नकारात्मक प्रवृत्तीच्या लोकांपासून दूर रहा

 

 

Whats_app_banner