Cheese Chilli Vada Pav Recipe: वडा पाव हा देशी स्नॅक आहे. तुम्ही आजपर्यंत अनेक वेळा वडापाव खाल्ला असेल. पण तुम्ही कधी चीज चिली वडा पाव ट्राय केला आहे का? या डिशमध्ये तुम्हाला दोन फ्लेवर्स चाखण्याचा आनंद मिळतो. सहसा वडापावच्या आत बटाटा वडा असतो, पण चीज चिली वडा पावमध्ये हिरव्या मिरच्या आणि भरपूर मसाल्यांसह वडा बनवला जातो. वडापावपेक्षा वेगळा दिसत असला तरी चव उत्तम आहे. लसूण चटणी किंवा आपल्या आवडत्या डीपसोबत सर्व्ह करू शकता. वडापाव हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध स्ट्रीट फूड आहे. २३ ऑगस्ट रोजी जागतिक वडा पाव दिनानिमित्त तुम्ही ही टेस्टी रेसिपी ट्राय करू शकता. चला तर जाणून घ्या कसे बनवायचे चील चिली वडा पाव.
- २ बन्स
- १/२ कप बेसन
- १/४ कप किसलेले लो-फॅट मोझरेला चीज
- १ टीस्पून चिंचेची चटणी
- २ मध्यम बटाटा
- १ मूठभर चिरलेला कांदा
- १ कप चिरलेली कोथिंबीर
- १/४ चिरलेली हिरवी मिरची
- १ टीस्पून बारीक चिरलेला लसूण
- कढीपत्ता
- १ टेबलस्पून लिंबाचा रस
- २ टेबलस्पून व्हेजिटेबल ऑइल
- ३/४ टीस्पून मोहरी पावडर
- १ टीस्पून लसूण पावडर
- १ टीस्पून धणे पूड
- ३/४ टीस्पून साखर
- १ टीस्पून लाल तिखट
- १/२ टीस्पून हळद
- १ चिमूट बेकिंग सोडा
- १/२ टीस्पून मोहरी
- मीठ चवीनुसार
सर्वप्रथम बटाटे उकळून मॅश करा. यानंतर एका कढईत तेल गरम करून त्यात कढीपत्ता, मोहरी, लसूण, मीठ आणि हिरव्या मिरच्या घाला. हे सर्व चांगले परतून घ्या. नंतर त्यात मॅश केलेले बटाटे आणि मोहरी पावडर, लाल तिखट, धणे पूड, लिंबाचा रस, बेसन आणि साखर घाला. गॅस बंद करून बटाट्याचे मिश्रण बाजूला ठेवावे. आता ग्राइंडरमध्ये कोथिंबीर आणि हिरवी मिरची घालून बारीक करून घ्या. त्यात हे मिश्रण चांगले मिक्स करून बाजूला ठेवा. एका बाऊलमध्ये बेसन, हळद, बेकिंग सोडा आणि मीठ घाला. यात थोडे थोडे पाणी घालून भज्याच्या बॅटरसारखे भिजवून घ्या. शेवटी यात गरम तेलाचे काही थेंब घालून ते मिक्स करा.
कढईत तेल गरम करून बटाट्याचे मिश्रणाचे गोळे बेसनाच्या पिठात बुडवून तेलात टाका. यानंतर वडा तळून एका प्लेटमध्ये काढून घ्या. आता वडापाव बनचे तुकडे करून त्यात चिंचेची चटणी आणि लसूण पावडर घाला. नंतर त्यात हिरवी मिरची वडा ठेवून त्यावर किसलेले चीज टाका. तुमचा चीज चिली वडापाव तयार आहे.
संबंधित बातम्या