मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  World Tuberculosis Day: टीबी स्पर्शाने पसरतो का? जाणून घ्या कसे होते शरीराला नुकसान

World Tuberculosis Day: टीबी स्पर्शाने पसरतो का? जाणून घ्या कसे होते शरीराला नुकसान

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 24, 2023 11:16 AM IST

Health Care Tips: टीबी हा संसर्गजन्य आजार आहे. त्यावर योग्य उपचार न केल्यास शरीर पोकळ होऊ शकते. या आजाराबाबत लोकांना अनेकदा प्रश्न पडतात. यापैकी काही उत्तरे येथे आहेत.

जागतिक क्षयरोग दिन
जागतिक क्षयरोग दिन (HT)

How TB Damage the Body: टीबी हा बॅक्टेरियामुळे होतो. ज्याचा जास्तीत जास्त परिणाम फुफ्फुसावर होतो. मात्र फुफ्फुसाशिवाय मेंदू, गर्भाशय, तोंड, लिव्हर, घसा यांमध्येही टीबी होऊ शकतो. हा एक आजार आहे जो कोणालाही होऊ शकतो. मात्र योग्य उपचाराने तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. या आजाराशी संबंधित प्रश्न लोकांच्या मनात येत राहतात. आज २४ मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिन (World Tuberculosis Day) साजरा केला जातो. क्षयरोगाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि क्षयरोगाच्या साथीचा सामना करण्यासाठी वेळेवर कृती करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी दरवर्षी हा दिवस पाळला जातो. जाणून घ्या टीबीशी संबंधित काही सामान्य प्रश्नांची उत्तरे.

टीबी म्हणजे काय?

क्षयरोग हा जीवाणूंमुळे होणारा आजार आहे, जो हवेद्वारे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरतो. हे सहसा फुफ्फुसात सुरू होते. सर्वात सामान्य म्हणजे फुफ्फुसाचा टीबी. हा संसर्ग खोकताना आणि शिंकताना तोंडातून आणि नाकातून बाहेर पडणाऱ्या छोट्या थेंबांमुळे पसरतो.

टीबी स्पर्शाने पसरतो का?

अनेक लोकांचा असे वाटते की, टीबी स्पर्शाने पसरतो. संक्रमित व्यक्तीचे कपडे, लिनन किंवा भांडी यांना स्पर्श केल्याने टीबी पसरत नाही. संक्रमित गर्भवती महिलेमुळे तिच्या बाळाला टीबी होऊ शकते. तसेच एड्स असलेल्या लोकांना क्षयरोगाचा धोका असतो. कारण त्यांची रोगप्रतिकारशक्ती जिवाणूंशी लढण्यासाठी खूप कमकुवत असते. जर आपण क्षयरोगाच्या रुग्णाशी बसून बोललो आणि त्याला खोकला नसेल तरी देखील संसर्ग होण्याचा धोका असू शकतो.

कसे होते शरीराचे नुकसान?

क्षयरोग हा धोकादायक आजार असल्याचे सिद्ध होऊ शकते. जर त्यावर योग्य उपचार केले नाहीत तर ते शरीर खराब करू शकते. तुम्हाला प्रश्न पडला असेल की, टीबीमुळे शरीराचे नुकसान कसे होते? तर आम्ही तुम्हाला सांगतो की शरीराच्या कोणत्याही भागात टीबीचे जीवाणू असतात, ते त्याच्या ऊतींना पूर्णपणे नष्ट करतात. रिपोर्ट्सनुसार, जर फुफ्फुसात टीबी असेल तर तो हळूहळू फुफ्फुसांना निरुपयोगी बनवतो.

कसा टाळायचा हा आजार

- प्रतिकारशक्ती योग्य ठेवा

- प्रोटीन डायट घ्या

- गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा

- कमी प्रकाश आणि घाणेरड्या ठिकाणी जाणे टाळा

- टीबीच्या रुग्णापासून थोडे अंतर ठेवा

- रुग्णाने मास्क घालावा

- खोकताना किंवा शिंकण्यापूर्वी तोंड झाकून ठेवावे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel