World Tribal Day 2024: का साजरा होतो आदिवासी दिन, काय आहे महत्व आणि इतिहास?-world tribal day 2024 what is the significance and history of adivasi day ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  World Tribal Day 2024: का साजरा होतो आदिवासी दिन, काय आहे महत्व आणि इतिहास?

World Tribal Day 2024: का साजरा होतो आदिवासी दिन, काय आहे महत्व आणि इतिहास?

Aug 09, 2024 12:14 PM IST

World Tribal Day 2024: शहरीकरणापासून दूर घनदाट जंगलात राहून हे आदिवासी लोक आपली संस्कृती जपत आहेत. त्यांच्या जगण्याचा मार्ग इतरांपेक्षा निश्चितच वेगळा आहे.

World Tribal Day
World Tribal Day

 world indigenous day 2024: भारतासह जगभरात विविध संस्कृती चलनात आहेत. त्यातीलच एक महत्वाची संस्कृती म्हणजे 'आदिवासी संस्कृती' होय. आदिवासींनी आपली संस्कृती आजही जशीच्या तशी जपली आहे. ऑस्ट्रेलियातील आदिवासी लोकांचे एक प्रसिद्ध घोषवाक्य आहे "भूमाता नेहमीच आदिवासी लोकांची आहे आणि नेहमीच राहिली''. यावरून त्यांचे भूमातेसोबत असलेले सर्वात जवळचे नाते निदर्शनास येते.

भूमी अर्थातच जमीन हा आदिवासींच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे. बऱ्याच लोकांना असे वाटते की, जमीन केवळ शेती आणि घरे यासारख्या मूलभूत गरजा पूर्ण करते. परंतु फक्त एका आदिवासीलाच माहित आहे की, आपल्याला पडायला, पुन्हा उठून उभं राहायला, योग्य मार्ग दाखवणाऱ्या, पोट भरणाऱ्या त्या जमिनीचे महत्व काय आहे. शहरीकरणापासून दूर घनदाट जंगलात राहून हे आदिवासी लोक आपली संस्कृती जपत आहेत. त्यांच्या जगण्याचा मार्ग इतरांपेक्षा निश्चितच वेगळा आहे.

आदिवासी दिवसाचे महत्व-

आधुनिक काळात जगभरातील आदिवासी संस्कृती आणि सभ्यता अधिक बळकट व्हावी त्याचे योग्य जतन व्हावे यासाठी ९ ऑगस्ट रोजी संयुक्त राष्ट्रांनी (UN) 'जागतिक आदिवासी दिवस' (जागतिक आदिवासी लोकांचा आंतरराष्ट्रीय दिवस) घोषित केला होता. आज या दिवसाला सुरुवात होऊन तब्बल ४३ वर्षे झाली आहेत. आज, हा दिवस जगभरातील जवळपास ९० हून अधिक देशांमध्ये राहणा-या आदिवासींना समर्पित आहे. ज्याचा मुख्य उद्देश आदिवासींच्या हक्क आणि अस्तित्वाच्या रक्षणासाठी जागरूकता पसरवणे आहे.

आदिवासी दिवसाचा इतिहास-

१९८२ पासून जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. आज जवळपास ४३ वर्षे पूर्ण झाली आहेत. आदिवासींच्या हक्कांना चालना देण्यासाठी संयुक्त राष्ट्र महासभेने ९ ऑगस्ट हा दिवस 'जागतिक आदिवासी दिवस' म्हणून घोषित केला होता. आदिवासी समाजाला अनेक शतकांपासून सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय आव्हानांचा सामना करावा लागत आहे. हा दिवस साजरा करून जगभरातील लोक आदिवासी समजाच्या योगदानाचे स्मरण करतात. आणि त्यांच्या हक्कांसाठी काम करण्याचीशपथ घेतात. त्या लोकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जगभरात अनेक संस्था कार्यरत असतात.

भारतातील आदिवासी लोकांची संख्या-

भारतात सुमारे १० कोटी ४० लाख आदिवासी लोक राहतात. विशेष म्हणजे हे देशाच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे ८ टक्के आहे. रिपोर्ट्सनुसार, देशातील सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, राजस्थान आणि ओडिसा या राज्यांमध्ये राहते. आदिवासी लोक राजकारणातदेखील सक्रिय आहेत. आदिवासी जिल्हा असणाऱ्या बांसवाडा आणि डुंगरपूर लोकसभा निवडणुकीसह चार विधानसभा मतदारसंघातून आदिवासी पक्षाचे प्रतिनिधी आदिवासी समाजाचे प्रतिनिधीत्व करत आहेत.

 

विभाग