Secret Places in Maharashtra: सध्या देशातील कोणते राज्य चर्चेच्या केंद्रस्थानी असेल तर त्याचे नाव महाराष्ट्रा आहे. नुकतंच महाराष्ट्रात गणेशोत्सव पार पडला. आता सर्वांना नवरात्री, दसरा, दिवाळीचे वेध लागले आहेत. दिवाळी म्हटलं की सुट्ट्याही येणार अशात अनेक लोक आत्तापासूनच ट्रिपचे प्लॅनिंग करत आहेत. तुम्हालाही ट्रीपसाठी जायचे आहे. परंतु बजेट आणि सुट्ट्या कमी आहेत? तर चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला 'वर्ल्ड टुरिझम डे' च्या निमित्ताने महाराष्ट्रातील अशी काही छुपी ठिकाणे सांगणार आहोत, जी फारच कमी लोकांना माहिती आहेत. त्यामुळे याठिकाणी तुम्ही शांतपणे निसर्गाचा आनंद घेऊ शकता. पाहूया ही ठिकाणे नेमकी कोनती आहेत.
पुणे मुंबई जवळील सर्व ठिकाणे पाहून झाली असतील, तर तुम्हाला पुण्यातीलच एक छुप्या ठिकांबाबत आम्ही आज सांगणार आहोत. पुण्यातील मावळ तालुक्यामध्ये कामशेत हे एक सुंदर गाव आहे. शिवाय मुंबईपासूनसुद्धा हे ठिकाण अगदी जवळ आहे. लोणावळा आणि खंडाळापासून कामशेत जवळच आहे. तुम्हालाही तेच तेच करून कंटाळा आला असेल आणि काहीतरी ऍडव्हेंचर करायचे असेल तर तुमच्यासाठी हे ठिकाण अगदी उत्तम आहे. विशेष म्हणजे फक्त ऍडव्हेंचरच नव्हे तर कामशेतमध्ये ऐतिहासिक लेणीसुद्धा आहेत. भाजा लेणी, बेडसे लेणी, कार्ला लेणी, विजापूर किल्ला, कोंडेश्वर मंदिर, पवना लेक अशी एकापेक्षा एक सुंदर ठिकाणे तुम्ही याठिकाणी पाहू शकता.
मुंबईमध्ये जितकी ठिकाणे पहाण्यासारखी आहेत, त्यापेक्षा दुप्पट ठिकाणे मुंबईच्या आसपासदेखील आहेत. आज आपण मुंबईजवळील असेच एक सुंदर ठिकाण जाणून घेणार आहोत. मुंबईपासून अत्यंत जवळ असलेले सुंदर ठिकाण म्हणजे सांधण व्हॅली होय. मुंबईपासून जवळपास १८३ किलोमीटर अंतरावर हे ठिकाण स्थित असेल. सह्याद्रीच्या खोऱ्यात वसलेल्या या ठिकाणाला मोठं निसर्ग सौंदर्य लाभलं आहे. सांगायचं झालं तर सांधण नाशिक जवळील भंडारदरा या भागात येते. कळसुबाई शिखर, रतनगड, अलंग मदन कुलंग अशी सुंदर ठिकाणं याठिकाणी पाहता येतात. शिवाय याठिकाणी तुम्हाला ऍडव्हेंचरसुद्धा करता येईल.
सातपुरा हे ठिकाण नाशिक आणि गुजरातच्या सीमेवर आहे. त्यामुळे अनेकांना हे गाव महाराष्ट्रात आहे गुजरातमध्ये असा संभ्रम निर्माण होतो. तर हे गाव सीमेवर स्थित आहे. सापुतरामध्ये सनसेट पाँईट खूपच सुंदर आहे, तसेच याठिकाणी पिकनिक पॉईंटदेखील लोकप्रिय आहे. सातपुरा गावातील ट्रायबल आर्ट अतिशय लोकप्रिय आहे. तुम्हाला जायचं असेल तर ऑक्टोबर ते फेब्रुवारी या ठिकाणी जाण्यासाठीचा उत्तम कालावधी आहे. अर्थातच आता दिवाळीच्या सुट्टीत तुम्ही याठिकाणी भेट देण्याचा प्लॅन करू शकता.
वरील इतर ठिकाणांप्रमाणेच कोलाडसुद्धा फारच सुंदर गाव आहे. रायगड जिल्ह्याच्या कुशीत हे गाव वसलेलं आहे. या गावाला सुंदर असं निसर्गसौंदर्य लाभलं आहे. मात्र सध्या हे गाव ऍडव्हेंचरसाठी जास्त ओळखले जात आहे. या गावात रिव्हर राफ्टिंग केले जाते. शिवाय सुंदर अशा हिरव्यागार निसर्गाचा तुम्हाला आनंद लुटता येतो. याठिकाणी ताला फोर्ट, गायमुख, कुडा लेणी, घोसाळा किल्ला, भिरा डॅम, सुतारवाडी लेक, वाली ट्रेक अशी एकापेक्षा एक निसर्गरम्य ठिकाणे तुम्हाला पाहता येतील.