मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  World Thyroid Day 2023: थायरॉईड आहे गंभीर आजार;जाणून घ्या प्रकार, लक्षणं आणि उपाय!

World Thyroid Day 2023: थायरॉईड आहे गंभीर आजार;जाणून घ्या प्रकार, लक्षणं आणि उपाय!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
May 25, 2023 07:24 AM IST

Health Care: पब्लिक हेल्थ अपडेटमधील एका अहवालानुसार, जागतिक स्तरावर असा अंदाज आहे की २०० दशलक्षाहून अधिक लोक थायरॉईड आजाराने ग्रस्त आहेत.

Thyroid Day 2023
Thyroid Day 2023 (Freepik )

Thyroid Symptoms Causes and Cure: आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकांना थायरॉईडचा त्रास होत आहे. ही अशी समस्या आहे, ज्यामुळे इतर अनेक आजारांचा धोकाही वाढतो. थायरॉईडची काही लक्षणे अगदी स्पष्ट असतात. परंतु, त्याची वेळीच ओळख न झाल्यास मोठी समस्या निर्माण होऊ शकते. दरवर्षी २५ मे ला 'जागतिक थायरॉईड जागरूकता दिवस' (World Thyroid Day 2023)  साजरा केला जातो. थायरॉईड रोग, त्यांची लक्षणे, प्रतिबंध आणि उपचार याबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी हा दिवस ओळखला जातो. हा दिवस २००८ साली युरोपियन थायरॉईड असोसिएशन (ETA) च्या प्रस्तावावर अस्तित्वात आला. पब्लिक हेल्थ अपडेटमधील एका अहवालानुसार, जागतिक स्तरावर असा अंदाज आहे की २०० दशलक्षाहून अधिक लोक थायरॉईड आजाराने ग्रस्त आहेत आणि यापैकी ५० टक्के प्रकरणे अशी आहेत की त्यांचे निदान होत नाही.

थायरॉईड म्हणजे काय?

थायरॉईड ही फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी आहे. हे मानेच्या आत आणि कॉलरबोनच्या अगदी वर स्थित आहे. ही एक अंतःस्रावी ग्रंथी आहे, म्हणजेच तिला नलिका नसते. त्यातून हार्मोन्स तयार होतात. थायरॉईडची समस्या सहसा महिलांना अधिक होते.

थायरॉईडचे प्रकार

थायरॉईडच्या समस्या दोन प्रकारच्या असतात. एक हायपर-थायरॉइड आणि दुसरा हायपो-थायरॉइड. हायपरमध्ये, हार्मोन जास्त प्रमाणात तयार होतो, तर हायपोमध्ये, प्रमाण कमी होते. दोन्ही प्रकारच्या समस्यांमध्ये, हार्मोन्सचे उत्पादन संतुलित नसते.

थायरॉईडची मुख्य लक्षणे कोणती?

थकवा जाणवणे, केस गळण्याची समस्या, महिलांमध्ये मासिक पाळी वेळेवर न येणे, अनावश्यक ताण, अचानक घाम येणे, पुरेशी झोप न लागणे आणि वारंवार भूक लागणे ही थायरॉईडची प्रमुख लक्षणे आहेत.

थायरॉईडचे कारण

ज्यांच्या कुटुंबात थायरॉईडची समस्या आहे किंवा आहे त्यांना धोका जास्त असतो. टाइप १ मधुमेह असलेल्या रुग्णांनाही हा आजार होऊ शकतो. वाढत्या वयामुळे, जास्त ताणतणाव, आधी केलेल्या थायरॉईड शस्त्रक्रिया आणि डाऊन किंवा टर्नर सिंड्रोम यामुळेही समस्या उद्भवू शकतात.

या गोष्टींच्या वापराने मिळतो आराम

दूध आणि दह्याचे सेवन केल्यास आराम मिळतो. यामध्ये असलेले कॅल्शियम, खनिजे आणि जीवनसत्त्वे थायरॉईडला आराम देतात. ज्येष्ठमधाचे सेवन देखील खूप फायदेशीर आहे. तसेच थायरॉईडमध्ये कर्करोग वाढण्यापासून रोखते. गहू आणि ज्वारीचा अधिक वापर करा. संपूर्ण धान्याचे सेवन करणे फायदेशीर आहे. त्यात फायबर, प्रथिने आणि जीवनसत्त्वे असतात.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel