मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  World Thalassemia Day 2024: का साजरा केला जातो जागतिक थॅलेसेमिया दिन? जाणून घ्या या दिवसाचा इतिहास आणि यंदाची थीम

World Thalassemia Day 2024: का साजरा केला जातो जागतिक थॅलेसेमिया दिन? जाणून घ्या या दिवसाचा इतिहास आणि यंदाची थीम

Hiral Shriram Gawande HT Marathi
May 08, 2024 12:15 AM IST

World Thalassemia Day 2024 Theme: थॅलेसेमिया हा रक्ताशी संबंधित एक गंभीर आजार आहे, ज्यामध्ये व्यक्तीच्या शरीरात हिमोग्लोबिन तयार होणे थांबते. हा आजार पालकांकडून मुलांमध्ये पसरतो. जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्त जाणून घ्या या दिनाचा इतिहास, महत्त्व आणि यावर्षीची थीम

World Thalassemia Day 2024: का साजरा केला जातो जागतिक थॅलेसेमिया दिन? जाणून घ्या या दिवसाचा इतिहास आणि यंदाची थीम
World Thalassemia Day 2024: का साजरा केला जातो जागतिक थॅलेसेमिया दिन? जाणून घ्या या दिवसाचा इतिहास आणि यंदाची थीम (freepik)

World Thalassemia Day History and Significance: दरवर्षी ८ मे रोजी जगभरात जागतिक थॅलेसेमिया दिन साजरा केला जातो. थॅलेसेमिया आजाराबद्दल जागरूकता निर्माण करणे, त्याची लक्षणे, निदान आणि उपचारांच्या पर्यायांबद्दल लोकांना शिक्षित करणे या मुख्य उद्देशाने हा विशेष दिवस साजरा केला जातो. थॅलेसेमिया हा रक्ताशी संबंधित एक गंभीर आजार आहे, ज्यामध्ये व्यक्तीच्या शरीरात हिमोग्लोबिन तयार होणे थांबते. हा आजार पालकांकडून मुलांमध्ये पसरतो. जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्त हा दिवस साजरा करण्यामागील इतिहास, महत्त्व आणि यावर्षीची थीम जाणून घेऊया.

ट्रेंडिंग न्यूज

थॅलेसेमियाची लक्षणे

- सतत सर्दी आणि खोकला

- सतत अशक्तपणा आणि उदासपणा

- श्वास घेण्यात अडचण

- अनेक प्रकारचे संक्रमण होणे

- शरीरात सतत पिवळसरपणा दिसणे

- दात बाहेर येणे

- वयानुसार शारीरिक विकासाचा अभाव

जागतिक थॅलेसेमिया दिनाचा इतिहास

थॅलेसेमिया इंटरनॅशनल फेडरेशन (TIF) द्वारे १९९४ साली आंतरराष्ट्रीय थॅलेसेमिया दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. जॉर्ज एंगलजॉस यांनी थॅलेसेमिया इंटरनॅशनल फेडरेशनचे अध्यक्ष आणि संस्थापक म्हणून काम केले. टीआयएफ, एक नॉन-प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे, जिची स्थापना १९८६ मध्ये पॅनोस एंगेल्स यांनी त्यांचा मुलगा जॉर्ज आणि इतर थॅलेसेमिया रुग्णांच्या स्मरणार्थ केली, ज्यांनी या रोगाशी लढा दिला होता.

जागतिक थॅलेसेमिया दिनाचे महत्त्व

थॅलेसेमिया हा रक्ताशी संबंधित आजार आहे, जो पालकांकडून त्यांच्या मुलांपर्यंत पसरतो. पण आजही या आजाराबाबत लोकांमध्ये अनेक समज- गैरसमज आहेत. अशा परिस्थितीत या आजाराची लोकांना योग्य माहिती मिळावी आणि जगभरात त्याबद्दल जनजागृती व्हावी या उद्देशाने दरवर्षी आंतरराष्ट्रीय थॅलेसेमिया दिन साजरा केला जातो.

 

जागतिक थॅलेसेमिया दिन २०२४ ची थीम

दरवर्षी जागतिक थॅलेसेमिया दिन साजरा करण्यासाठी एक विशेष थीम ठेवली जाते. या वर्षीची थीम 'सक्षम जीवन, प्रगती स्वीकारणे: सर्वांसाठी समान आणि सुलभ थॅलेसेमिया उपचार' (Empowering Lives, Embracing Progress: Equitable and Accessible Thalassaemia Treatment for All) अशी आहे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel