मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  World Television Day: जागतिक दूरचित्रवाणी दिवस २१ नोव्हेंबरला का साजरा केला जातो? जाणून घ्या

World Television Day: जागतिक दूरचित्रवाणी दिवस २१ नोव्हेंबरला का साजरा केला जातो? जाणून घ्या

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Nov 20, 2023 09:42 PM IST

Theme and History of World Television Day: जागतिक दूरचित्रवाणी दिन दरवर्षी २१ नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. जागतिक टेलिव्हिजन दिनाचा इतिहास काय आहे आणि भारतात टीव्ही कसा आला याबद्दल जाणून घेऊयात.

Why is World Television Day Celebrated on November 21
Why is World Television Day Celebrated on November 21 (Freepik)

World Television Day 2023: जागतिक दूरचित्रवाणी अर्थात वर्ल्ड टेलिव्हिजन दिन दरवर्षी २१ नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. जगभर क्रांती घडवून आणणारा हा शोध होता. टीव्हीच्या माध्यमातून तुम्ही प्रत्येक क्षेत्राशी जोडले जाऊ शकता. यामध्ये मनोरंजन, शिक्षण आणि राजकारण अशा अनेक क्षेत्रांचा समावेश आहे. म्हणूनच टेलिव्हिजन दिन दरवर्षी त्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी साजरा केला जातो. हे माहितीचे माध्यम आहे ज्याने समाजात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या इलेक्ट्रॉनिक माध्यमामुळे जगात घडणाऱ्या गोष्टींची जाणीव आपल्याला राहते. टेलिव्हिजनचा इतिहास काय आहे आणि भारतात त्याची सुरुवात कशी झाली ते जाणून घेऊयात.

ट्रेंडिंग न्यूज

काय आहे इतिहास?

नोव्हेंबर १९९६ मध्ये, संयुक्त राष्ट्र संघाने पहिला जागतिक दूरदर्शन मंच आयोजित केला. अनेक मान्यवर माध्यमातील व्यक्तीही यात सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्यात दूरचित्रवाणीच्या वाढत्या महत्त्वावर चर्चा झाली. यावेळी संयुक्त राष्ट्रांनी २१ नोव्हेंबर रोजी जागतिक दूरचित्रवाणी दिन साजरा करण्याची घोषणा केली होती.

भारतातील टीव्ही कधी आला?

टीव्हीचा शोध लागल्यानंतर सुमारे ३ दशकांनी भारतात टीव्ही आला. UNESCO च्या मदतीने १५ सप्टेंबर १९५९ रोजी नवी दिल्ली येथे टेलिव्हिजनची सुरुवात झाली. ऑल इंडिया रेडिओ अंतर्गत टीव्ही सुरू झाला. आकाशवाणी भवनात टीव्हीचे पहिले सभागृह बांधण्यात आले. त्याचे उद्घाटन राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते झाले. भारतात टेलिव्हिजनचे पहिले रंगीत प्रसारण १५ ऑगस्ट १९८२ रोजी इंदिरा गांधींच्या भाषणाने झाले. यानंतर नव्वदच्या दशकात रामायण, महाभारत यांसारख्या मालिका सुरू झाल्या.

दूरचित्रवाणीचा इतिहास

दूरचित्रवाणीचा शोध स्कॉटिश अभियंता जॉन लोगी बेयर्ड यांनी लावला होता. त्यावेळी त्यांचे वय अवघे २१ वर्षे होते. याचा शोध १९२४ मध्ये लागला होता. यानंतर, १९२७ मध्ये, फर्न्सवर्थने पहिले कार्यरत दूरदर्शन तयार केले. ते १ सप्टेंबर १९२८ रोजी पत्रकारांना सादर केले गेले. १९२८ मध्ये जॉन लोगी बेयर्ड यांनी रंगीत टेलिव्हिजनचा शोध लावला. सार्वजनिक प्रक्षेपण १९४० मध्ये सुरू झाले.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही.)

WhatsApp channel